सावंतवाडी (प्रतिनिधी) : सध्या उन्हाळ्याचा पारा प्रचंड वाढल्याने जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले आहेत. जंगलात पाणी आणि अन्न मिळत नसल्यामुळे वन्यप्राणी आता पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. सावंतवाडी तालुका, शहर आणि आजूबाजूच्या परिसरात वन्यप्राण्यांचे दर्शन वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पाणी आणि चारा शोधण्यासाठी हे प्राणी जंगलाबाहेर पडत आहेत. रस्ता ओलांडताना अनेकदा हे प्राणी अचानक वाहनचालकांच्या समोर येत असल्याने लोकांची मोठी घाबरगुंडी उडत आहे.
काही ठिकाणी अचानक समोर आलेल्या प्राण्यांमुळे छोटे-मोठे अपघातही घडले आहेत. विशेषतः गवा रेडा या प्राण्याचा वावर सावंतवाडी शहरात आणि लगतच्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हे प्राणी भरवस्तीत किंवा रस्त्यावर बिनधास्त वावरत असल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जंगलात अन्नाचीही टंचाई निर्माण झाल्याने वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
रात्रीच्या वेळी प्रवास करताना किंवा जंगलाच्या पट्ट्यात वावरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात बागा किंवा लोकवस्तीत येऊ शकतात, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील.

























































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.