पनवेल - सुधागड तालुक्यातील पाच्छापुर वनवासी बहुल क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक शैक्षणिक सार्वजनिक अन सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ पनवेल च्या वतीने सोमजाई शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत उर्फ दादा घोसाळकर यांना वोकेशनल एक्सलन्स अवॉर्डने एक स्वयंसेवक या नात्याने महत्त्वाचा पुरस्कार देऊन पनवेल येथे रविवारी सन्मानित करण्यात आले. यावेळी सन्मानपत्र, शाल, श्रीफळ चंद्रकांत घोषालकर यांना रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ पनवेल हे सामाजिक जाणवीतून गेल्या अनेक वर्षापासून समाजकार्य करून सामाजिक बांधिलकी जपत आहेत. समाजातील दीनदुबळे वंचित घटकापर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक असलेल्या सेवा सुविधा पुरवण्याचं सामाजिक काम हे त्यांच्या क्लबच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून केले जात आहे. गेल्या वर्षी सुधागड तालुक्यातील पाच्छापूर गावात अतिदुर्गम भागात सोमजाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ दादा घोसाळकर यांनी निर्माण केलेल्या शाळेची पाहणी रोटरी क्लबच्या सदस्यांनी केली होती.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दुर्गम भागातील वनवासी, आदिवासी व अन्य समाज बांधवांना शिक्षणाची व्यवस्था त्यांच्या राहण्याच्या ठिकाणीच करून ज्ञानदानाचे कार्य ते अनेक वर्ष करीत आहेत. जनकल्याण पतसंस्थेची निर्मिती करून समाजातील अति गरजूंना व्यवसायासाठी कर्जाची उपलब्धता तत्पर्तने करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे कामही ते करत आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काम करून त्यांनी ग्रुप ग्रामपंचायत पाच्छापूरचे सरपंच अनेक वर्ष सांभाळून शासनाच्या विविध योजना ह्या पाच्छापूरच्या पंचकोशीत कार्यान्वित केलेले आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या सुधागड तालुक्यातील चंद्रकांत उर्फ दादा घोसाळकर यांचा वोकेशनल एक्सलीएन्स अवॉर्डने पुरस्कारित करून गौरव करण्यात आला.
यावेळी रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे, असिस्टंट गव्हर्नर सुरेश शेडगे, रोटरीचे पदाधिकारी डॉ. दीपक पुरोहित, डॉ. शैलेश पालेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष स्मिता मंडलिक सेक्रेटरी डॉ. अरविंद कुलकर्णी,सोमजाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक उत्तम माळी, सुधागड तालुक्यातील भाजपचे युवा नेतृत्व रोहन दगडे तसेच घोसाळकरांचे कुटुंबीय या गौरव समारंभाच्या वेळी उपस्थित होते. दादा घोसाळकरांचा रोटरी क्लबने केलेल्या गौरवाबद्दल सुधागडसह रायगडमधील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. रोटरी क्लब ऑफ पनवेलकडून या दुर्गम भागातील शाळेमध्ये ई-लर्निंग किट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून दोन शौचालयावरील शेडची बांधणी ही रोटरी क्लब च्या माध्यमातून विद्यालयात केली जाणार असल्याचे यावेळी घोषित करण्यात आले आहे.


1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.