loader
Breaking News
Breaking News
Foto

मोहोपाडा येथे रायगड जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा उत्साहात, दोनशेहून अधिक खेळाडूंचा सहभाग

रसायनी (राकेश खराडे) - रायगड जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा २०२६ मोहोपाडा येथील जनता विद्यालय शाळेचा सभामंडपात मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. जिल्ह्यातील विविध भागांतून सहभागी झालेल्या दोनशेहून अधिक खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. अत्यंत चुरशीच्या लढतींमध्ये अटॅकर्स तायक्वांदो अकॅडमीने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धेचे उदघाटन डाॅ.पारनेरकर महाराज विद्यालयाचे अध्यक्ष तुळशीदास पाटील आणि सरपंच उमाताई मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेंचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे: प्रथम क्रमांक: अटॅकर्स तायक्वांदो अकॅडमी, द्वितीय क्रमांक: गुरुकुल तायक्वांदो अकॅडमी, तृतीय क्रमांक: अगस्तू तायक्वांदो अकॅडमी, चतुर्थ क्रमांक: किंग फायटर क्लब (पोलीस हेडकॉटर), पाचवा क्रमांक: तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी... या स्पर्धेचे आयोजन तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष संदीप सुदाम मुंढे, सचिव सचिन माळी आणि खजिनदार रोहित तानाजी सिनलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांच्या प्रभावी नियोजनामुळे स्पर्धा वेळेत आणि अत्यंत शिस्तपूर्ण पद्धतीने पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कौशल्याला चालना देणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी बोलताना सांगितले. यावेळी सांगता समारंभात जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संदीप मुंढे यांच्याहस्ते विजेत्या खेळाडूंना पदके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघांचा विशेष सन्मान करण्यात आला. मोहोपाडा येथील स्पर्धा खेळाडूंना उत्कृष्ट व्यासपीठ देणारी ठरली असून, भविष्यात अशा स्पर्धांमुळे जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाला अधिक चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg