loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी खोऱ्यात वावर असलेल्या जंगली हत्ती कळपात पडली पुन्हा फुट; हेवाळे, मोर्ले, सासोलीमध्ये वावर

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गेल्या काही दिवसांपासून घोटगे परिसरात जंगलात तसेच खाजगी काजू बागेत वावर असलेल्या तिलारी खोऱ्यातील जंगली हत्ती कळपात पुन्हा फुट पडली आहे. एकञ आलेले हत्ती पुन्हा वेगळे झाले आहेत. यामुळे वन अधिकारी कर्मचारी यांची धावपळ सुरू झाली आहे. शनिवारी दुपारी हत्ती कळप लोकेशन बघितले असता ओंकार हत्ती सासोली भटवाडी जंगलात, तर एक मादी दोन लहान पिल्ले ही मोर्ले वन जंगलात तर बाहुबली लहान मादी हेवाळे गावात वावर असल्याचे दिसून आले आहे. हत्ती कळपात नेमके काय चालले आहे. हा प्रश्न शेतकरी याना पडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात काजू हंगाम सुरू आहे. शिवाय हत्ती आवडते खाद्य फणस देखील या ठिकाणी मोठया प्रमाणात आहेत. हत्ती येथून पुन्हा चंदगड किंवा आजरा तालुक्यात जाण्याची शक्यता कमी आहे. तर जंगली हत्ती बंदोबस्त करा यासाठी आता शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत.

टाईम्स स्पेशल

जंगली हत्ती कळपात फुट पडली आहे. यामुळे वन अधिकारी व कर्मचारी तसेच हाकारी यांची धावपळ उडाली आहे. तीन ठिकाणी हत्ती वर लक्ष ठेवावे लागत आहे. दिवसरात्र जागरण करण्याची वेळ कर्मचारी वर्गावर आली आहे. दोडामार्ग वन विभागकडून शनिवारी दुपारी मिळालेल्या माहितीनुसार जंगली हत्ती मधिल ओंकार सासोली भटवाडी जंगलात लोकेशन मिळाले तर मोठी मादी सोबत दोन लहान पिल्ले मोर्ले वन जंगलात, तर बाहुबली छोटी मादी ही हेवाळे या ठिकाणी लोकेशन मिळाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg