loader
Breaking News
Breaking News
Foto

कुसुर बाजारवाडी शाळेत 'गुढी संस्कारा'चा दरवळला सुगंध; संस्कारांच्या गुढीने रंगले नववर्ष!

वैभववाडी (प्रतिनिधी) - कुसुर येथील श्री छत्रपती विद्यामंदिर कुसुर बाजारवाडी या शाळेमध्ये हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुढी संस्कार हा स्तुत्य उपक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. आजच्या आधुनिक युगात मुलांवर भारतीय संस्कृतीचे योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांना सणांमागील शास्त्रीय परंपरेची ओळख व्हावी या उदात्त हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्रांगणात शास्त्रोक्त पद्धतीने गुढी उभारून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. गुढीला साखरेची गाठी, हार-फुले आणि कडूनिंबाची पाने अर्पण करून मंगलमय वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

'गुढी संस्कार' उपक्रमाची वैशिष्ट्ये: शास्त्रीय माहिती- गुढीपाडव्याचे धार्मिक महत्त्व आणि त्यामागील नैसर्गिक व शास्त्रीय कारणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सविस्तरपणे समजावून सांगितली. आरोग्य आणि आयुर्वेद- कडूलिंबाच्या पानांचे सेवन आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, याचे महत्त्व पटवून देऊन विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. संस्कारांची शिदोरी - केवळ सण साजरा न करता त्यातून मिळणारी नैतिक मूल्ये आणि शिस्त विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अक्षय साबळे तसेच व्यवस्थापन समिती सदस्य अक्षरा साबळे, शलाका पाटील, सुगंधा पाटील, जयवंत बिले उपस्थित होते. तसेच अंगणवाडी सेविका समिधा साळुंखे, मदतीनीस शीला पाटील, शाळेचे मुख्याध्यापक सचिन कनोजे आणि उपशिक्षिका मनीषा सरकटे आदी मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

मुख्याध्यापक सचिन कनोजे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, "विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध वारशाची माहिती मिळावी आणि त्यांच्यावर लहानपणापासूनच चांगले संस्कार व्हावेत यासाठी 'गुढी संस्कार' हा उपक्रम राबवण्यात आला आहे. शाळेने घेतलेल्या या संस्कारक्षम उपक्रमाचे ग्रामस्थांनी आणि पालकांनी विशेष कौतुक केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg