loader
Breaking News
Breaking News
Foto

'बेटी बचाओ बेटी पढाओ' मालवण तालुक्यात डिजिटल चित्ररथ जनजागृती

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या मालवण तालुक्यातील डिजिटल चित्ररथ जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात बालिका/महिलांविषयक योजना प्रचार प्रसिद्धी करणेच्या अनुषंगाने 'बेटी बचाओ बेटी पढाओ' डिजिटल चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. मालवणमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांसह, महसूल नायब तहसीलदार नीलिमा प्रभुदेसाई, बाल विकास प्रकल्प अधिकारी मालवण उल्का खोत-हजारे, निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर, पुरवठा शाखा निरीक्षक शीला निकस, अभय केंद्र मालवण सहाय्यक संरक्षण अधिकारी मेघा वजराटकर, अभय केंद्र मालवण बहुउद्देशीय कर्मचारी निकिता पाटकर तसेच महसूल चे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. 'बेटी बचाओ- बेटी पढाओ' ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मुलीचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टीकोनातून जनजागरण मोहिमे अंतर्गत गर्भवती मातांची नोंदणी. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याबाबत जनजागृती, वाढदिवस साजरा करणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे. मुलगी वाचवा- मुलगी शिकवा याबाबत मार्गदर्शन, गुड्डा-गुड्डी बोर्ड त्यावर मुला-मुलींची जन्मसंख्या लिहून ते सार्वजनिक ठिकाणी लावणे, पथनाट्ये इ.जनजागृती कार्यक्रम जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहेत.

टाइम्स स्पेशल

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग यांचे सुचनेनुसार जिल्ह्यात बालिका, महिलांविषयक योजना प्रचार, प्रसिद्धी करणेच्या अनुषंगाने 'बेटी बचाओ बेटी पढाओ' डिजिटल चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. मालवणमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ करून बालिका, महिलांविषयक विविध योजना, कायदे व सायबर सुरक्षा जाहिरात प्रचार याबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg