वैभववाडी (प्रतिनिधी) - दोन महिन्यापूर्वी खाजगी आराम बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा किमती कॅमेरा चोरणाऱ्या सराईत चोरट्याला वैभववाडी पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. कमलकुमार मुकुंदलाल रेहान वय 40 रा. फरीदाबाद राज्य हरियाणा असे संशयित आरोपीचे नाव आहे. फिर्यादी यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तो मडगाव गोवा ते नांदेड असा खाजगी बसणे प्रवास करीत होता. प्रवासादरम्यान त्याचा सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचा कॅमेरा अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. फिर्यादी याचा फोटोग्राफर चा व्यवसाय आहे. तसेच त्याचे स्वतःचे गोर फिल्म नावाचे चॅनल आहे. त्याने 8 डिसेंबर 2025 नुसार रोजी सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा नवीन कॅमेरा खरेदी केला होता. तो दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी शर्मा ट्रॅव्हल्सने नांदेड येथून गोवा येथे गाण्याच्या शूटिंग साठी गेला होता.
गोव्यातील काम आटपून तो 28 जानेवारी रोजी गोवा येथून शर्मा ट्रॅव्हल्स ने नांदेडला जात होता. बस रात्री 8.30 वाजता वैभववाडी हॉटेल येथे थांबवली होती. यावेळी फिर्यादी हा खाली उतरून बाथरूमला जाऊन आला. बस येथून सुटल्यानंतर करूळ चेक नाका येथे पोलिसांनी तपासणीसाठी थांबवली. त्यावेळी यांच्या लक्षात आले की त्यांच्या बॅगमध्ये असलेला कॅमेरा गायब आहे. त्यांनी याबाबत बसच्या ड्रायव्हरला माहिती दिली. यावेळी बसमध्ये असलेला सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बस हॉटेल येथे थांबवले असताना एक अनोळखी इसम त्यांच्या बॅगमधून कॅमेरा काढून घेत असताना दिसत आहे. गाडीतील सर्व प्रवाशांना खाली उतरून चौकशी करण्यात आली. मात्र प्रवाशांमधील कोणीही सीसीटीव्ही कैद झालेल्या चेहऱ्याचे साम्य असलेला दिसून आलेला नाही. त्यामुळे अखेर यांनी आपला कॅमेरा चोरीस गेल्याची तक्रार वैभववाडी पोलीस ठाण्यात दिली होती.
वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज कुमार सोनवलकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव व सहकार्याने याप्रकरणी सीसीटीव्हीच्या साह्याने चोरट्याचा शोध घेतला आहे. कमलकुमार हा सराईत चोरटा असून त्याच्यावर यापूर्वीही अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे अन्य ठिकाणी नोंद आहेत. ही चोरी करण्यापूर्वी तो दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास करून तिथून कार भाड्याने घेऊन तो गोवा येथे आला होता. गोवा येथे खाजगी आराम बस थांबतात. त्या ठिकाणी त्याने प्रवाशांची रेकी केली होती. त्याद्वारेच फियादी यांच्याकडे त्यांच्या बॅगमध्ये किमती कॅमेरा असल्याचे चोरट्याने हेरले होते. त्याने त्या बसचा वैभववाडी येथील हॉटेलपर्यंत पाठलाग केला. या हॉटेलवर बस थांबवली असता राठोड हे बस मधून खाली उतरले. नेमकी हीच संधी साधून चोरट्याने बस मध्ये चढून त्यांच्या बागेतील कॅमेरा घेऊन तिथून पोबारा केला होता. वैभववाडी पोलिसांनी सीसीटीव्ही व अन्य माहितीच्या आधारे दिल्ली येथे जाऊन कमलकुमार याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.




















.jpg)






























































































































































































































































































































.jpg)















4.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.