रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्यटन आणि जैवविविधतेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा प्रकल्प आता प्रत्यक्षात उतरणार आहे. तालुक्यातील मालगुंड येथे भव्य प्राणीसंग्रहालय (Zoo) उभारण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने १६० कोटी २७ लाख ६७ हजार ७०८ रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. ‘सिंधुरत्न समृद्ध योजने’ अंतर्गत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मार्गी लागणार असून, यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून उद्या यासंदर्भाता महत्त्वाची आढावा बैठक होणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत या प्राणी संग्रहालयाचे काम होणार होते. परंतु आता ते एमआयडीसीकडुन होणार असल्याचे समजते. मालगुंड येथे प्राणी संग्रहालयासाठी २५.४९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जागेची ४.२८ कोटी रुपये किंमत मूळ जमीन मालकांना अदा करण्यात आली आहेत. सध्या या जमिनीच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (MIDC) संरक्षक भिंतीचे काम प्रगतीपथावर आहे. या संरक्षक भिंतीसाठी २१.७३ कोटींची मंजुरी असून त्यापैकी ७ कोटींचा निधी वितरित झाला आहे.
प्राणी संग्रहालयासाठी १६० कोटी २८ लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून ६०.७५ कोटींच्या निधीला मंजूरी दिली आहे. तर उर्वरित निधी एमआयडीसी आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेतून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. या प्रकल्पासाठी ' अरफाक अहमद कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, नागपूर' यांची वास्तुविशारद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मालगुंड सारख्या पर्यटनस्थळी हे प्राणी संग्रहालय होणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढून स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.




















.jpg)






























































































































































































































































































































.jpg)















8.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.