देवळे (प्रकाश चाळके) - चैत्र महिन्यातील रविवारी भरलेल्या देवरुखच्या आठवडी बाजारात आज खास उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गुढीपाडव्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर कैरीला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असल्याने बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. गुढीला कैरी लावणे पवित्र मानले जात असल्याने या काळात कैरीची मागणी नेहमीच वाढलेली असते. यंदाच्या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक रायवळ कैरीचे आगमन. संगमेश्वर तालुक्यातील मेघी, कनकाडी, आंगवली, सायले, काटवली, निवे, कोंढरण, चाफवली परिसरातून देवरुखला कैरी आलेली आहे. कोकणातील पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतीने उगवणारी रायवळ कैरी हापूसपेक्षाही अधिक मानाची मानली जाते. मात्र, यावर्षी बदलत्या हवामानाचा फटका रायवळ उत्पादनालाही बसला असून उत्पन्नात काही प्रमाणात घट झाली आहे.
तरीही कोणत्याही रासायनिक खते किंवा औषधांचा वापर न करता, निसर्गाशी लढा देत टिकून राहिलेल्या रायवळ कैरीला बाजारात तब्बल १०० रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकत आहे. बाजारात कैरी विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबगही दिसून येत आहे. दरम्यान, हापूस आंब्याला विविध संकटांचा सामना करावा लागत असताना, रायवळ हा कोकणवासीयांसाठी मजबूत पर्याय ठरू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
“रायवळच हापूसचा बापूस” अशी ओळख असलेल्या या स्थानिक जातीचे संवर्धन केल्यास भविष्यात हापूस उत्पादनालाही पुन्हा चांगले दिवस येऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. गुढीपाडव्याच्या नववर्षारंभी रायवळ कैरीला मिळालेला प्रतिसाद हा कोकणातील शेतीसाठी आणि स्थानिक उत्पादकांसाठी सकारात्मक संकेत मानला जात असून, आगामी काळात कोकणात पुन्हा समृद्धीचे दिवस येण्याची नांदी म्हणून याकडे पाहिले जात आहे.
























.jpg)































































































































































































































































































































.jpg)















11.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.