loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडी: २५ लाखांच्या खैर लाकडासह दोघे वनविभागाकडून ताब्यात

​सावंतवाडी: सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने इन्सुली येथे मोठी कारवाई करत खैराच्या लाकडाची बेकायदा वाहतूक रोखली आहे. या कारवाईत १० लाखांचा खैर लाकुड आणि १५ लाखांचा टेम्पो असा एकूण २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तळवडे येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. विनापरवाना खैराच्या लाकडाची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती वनविभागाला मिळाली होती. यानुसार पथकाने खामदेव नाका परिसरात सापळा रचला होता. संशयित टेम्पो येताच त्याची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खैराचे लाकूड सापडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जप्त केलेला सर्व मुद्देमाल सावंतवाडी उपरल येथील विक्री आगारात जमा करण्यात आला आहे. ही कारवाई वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप आणि त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg