loader
Breaking News
Breaking News
Foto

दयाळ जि.प. गटात रमजान ईदनिमित्त जि.प.सदस्य अण्णा कदम यांची सदिच्छा भेट

खेड - खेड तालुक्यातील दयाळ जिल्हा परिषद गटात पवित्र रमजान ईद सणानिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या निमित्ताने दयाळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांनी आपल्या गटातील नांदगाव, संगलट, रजवेल आमशेत, कर्जी व सवणस या गावांना भेट देत मुस्लिम बांधवांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मुस्लिम बंधू-भगिनींशी संवाद साधत सणाच्या आनंदात सहभागी होत सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच गावांमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावाही त्यांनी घेतला व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम हे ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या घरी आल्याने मुस्लिम बांधवांच्या चेहर्‍यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता. त्यांच्या या भेटीमुळे सामाजिक ऐक्य आणि आपुलकीचे वातावरण अधिक दृढ झाल्याची भावना मुस्लिम बांधवांनी व ग्रामस्थांनी व्यक्त केली. या प्रसंगी भडगाव पंचायत समिती गणाचे सदस्य संग्राम कदम, दयाळ गण पंचायत समिती सदस्या सौ.शमिका सुर्यकांत म्हादे, उद्योजक साहील कदम, नागेश शिगवण, विनायक खानविलकर, विभाग सुनिल पवार, अविनाश जाधव, सुर्यकांत म्हादे, दिनेश पाष्टे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg