loader
Breaking News
Breaking News
Foto

रामनवमीचे औचित्य साधतं कसबा श्रीराम मंदिरात प्रथमच संस्कृत गीत रामायणाचे आयोजन

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - तालुक्यातील प्राचीन असलेल्या श्रीराम मंदिरात प्रतिवर्षा प्रमाणे गुरवार ता, 26 मार्च रोजी रामनवमीचे औचित्य साधतं अणेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या सर्व कार्यक्रमासाठी तालुक्यातील जास्तीतजास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे विश्वस्थ बेडेकर गुरुजी यांनी केले आहे. सकाळी श्रीरामचंद्राची पूजा, अभिषेक, सकाळी 11 ते 1 वाजता कीर्तनकlर माधुरी जोशी बेडेकर यांचे श्री रामचंद्रlच्या जीवनावर सुश्रlव्य कीर्तन होणार आहे, त्यानंतर प्रभु श्रीराम यांचा जन्मोत्सव होऊन महाआरती करणेत येईल, दुपारी 2 वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संध्याकाळी तीन ते पाच या वेळेत कसबा श्रीराम मंदिरात तालुक्यात प्रथमच मुळं मराठी गीत रामायण महाराष्ट्र वाल्मिकी शब्दप्रभु ग. दि. माडगूळकर लिखित संस्कृत पंडित श्रीमान सिताराम भालचंद्र यांनी संस्कृत अनुवादीत केलेले, संस्कृत गीत रामायनम (सर्व कलाकार हे नेरळ येथील ता,कर्जत जि, रायगड येथील आहेत ) या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाचे गायकवृंद आहेत धनंजय जोशी, विकास कुलकर्णी, सीमा पठवर्धन, देवकी धोंगडे, आर्या धोंगडे. या संस्थेचा हा पहिलाच कार्यक्रम असुन असा कार्यक्रम संगमेश्वर तालुक्यात देखील प्रथमच होत असल्याने या कार्यक्रमाचा जास्तीतजास्त भाविकांनी आणि गीत प्रेमिनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिराच्या विश्वस्थ मंडळींनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg