मालवण (प्रतिनिधी) - गुढीपाडव्याच्या सणाला गुढी उभारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिवारीच्या काठीला म्हणजेच बांबूला सध्या अनेक कृत्रिम पर्याय समोर येत असल्याने या सणातील नैसर्गिकपणा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने मालवण मधील युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेने गुढीपाडव्याच्या सणाला चिवारीचे रोप लावण्याचे आवाहन केल्यावर त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून मालवण शहर व परिसरात संस्थेतर्फे चिवारीची ८५ रोपे वितरित करण्यात आली. मानव चिवारीच्या काठीचा म्हणजेच बांबूचा वापर अनेक वर्षांपासून विविध कामांसाठी करत आला आहे. कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चिवारी डौलाने उभी राहते. या चिवारीच्या काठीला गुढीपाडव्याच्या सणात मोठे महत्व असून गुढी उभारण्यासाठी चिवारी वापरली जाते. माणसाने चिवारीला मानाचे स्थान दिल्याने नववर्षाच्या सुरुवातीलाच ही काठी पूजनीय ठरते.
आजही गुढीसाठी चिवारीची काठी वापरली जात असली तरी काळाच्या ओघात चिव्याच्या काठीला पर्याय असणाऱ्या अनेक कृत्रिम गोष्टी समोर आल्या आहेत. परंतु आता कृत्रिम गोष्टींचा कचरा आणि वाढत प्रदूषण लक्षात घेता परत आपल्याला शाश्वत विकासासाठी चिवारीच उपयोगात आणावी लागेल, हा विचार युथ बिट्स फॉर क्लायमेट या पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या संस्थेने मांडत तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी यंदाच्या गुढीपाडव्याला चिवारीचे रोप लावावे, त्यासाठी रोपे दिली जातील असे आवाहन केले होते. या आवाहनाला मालवणातून उत्तम प्रतिसाद लाभला. मालवण शहर व परिसरातील ८५ जणांना संस्थेकडून चिवारीचे रोप भेट देण्यात आले. या उपक्रमात सहभागी निसर्गप्रेमींनी चिवारीचे रोप जगवण्याचा आणि वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, अशी माहिती युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेच्या अध्यक्ष मेगल डिसोजा यांनी दिली.



















.jpg)






























































































































































































































































































































.jpg)















7.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.