वैभववाडी (प्रतिनिधी) : एडगाव गुरववाडी येथील सिताबाई बाळु गुरव यांचे वयाच्या 101 वर्षी निधन झाले. त्या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. माजी मंत्री महादेव जानकर यांचे स्वीय सहाय्यक तानाजी गुरव, मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक शाहु गुरव तसेच सामाजिक कार्यकर्ते संभाजी गुरव, शिवाजी गुरव यांच्या त्या मातोश्री होते. सिताबाई गुरव यांच्यावर एडगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी मंत्री महादेव जानकर यांनी सिताबाई गुरव यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. मंत्री पंकजा मुंडे यांच्या मातोश्री यांनी गुरव कुटुंबियांचे फोनवरून संपर्क साधत सांत्वन केले.
गुरव समाज रायगड, ठाणे मुंबई संसथेचे अध्यक्ष बंडू वारेश्वर खंडागळे तसेच कार्यकारी मंडळ यांच्या वतीने सिताबाई गुरव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सिताबाई गुरव या जुन्या पिढीच्या एकमेव साक्षीदार होत्या. अत्यंत गरीब परिस्थितीत त्यांनी आपल्या कुटुंबाचा डोलारा सांभाळला होता. आजही त्यांचे कुटुंब एकत्रित गुण्यागोविंदाने नांदत आहे. सिताबाई यांच्या निधनाची बातमी समाजातात सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी अंत्यविधीला हजेरी लावली. सर्वांच्या उपस्थित सिताबाई गुरव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गुरव यांच्या पश्चात चार मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे.




















.jpg)






























































































































































































































































































































.jpg)















5.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.