loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात रोटरी क्लबतर्फे मधुमेहग्रस्तांसाठी नेत्रपटल तपासणी शिबीर

मालवण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब मालवण व आरसीसी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २५ मार्च रोजी सकाळी ८ वा. पासून लिमये हॉस्पिटल मालवण येथे मधुमेहग्रस्त रुग्णांची मोफत नेत्रपटल (डोळ्याचा पडदा) OCT तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन व सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली यांची मोबाईल व्हॅन उपलब्ध असणार आहे. या तपासणीच्या माध्यमातून मधुमेहामुळे येणारे अंधत्व निदान करून ते टाळता येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येईल. मधुमेह असलेल्या ५० वर्षे वरील व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा. शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रथम नोंदणी करणाऱ्या ६० रुग्णांची तपासणी करण्यात येईल. तरी नाव नोंदणीसाठी लिमये हॉस्पिटल ०२३६५- २५२२६६ किंवा ७०५७९०६६८१ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg