खेड - शिवतर रोड श्री भैरी भवानीनगर मंदिरात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. शनिवार, २१ मार्च -२०२६ रोजी खेड शहरातून प्रथमच पालखी परिक्रमा मंदिरातून पालखी वाजत गाजत, चित्ररथ, उंट, हत्तीच्या सहभागाने व स्वामींनामाचा वाद्यांच्या गजरात जयघोष करत भक्तिमय वातावरणात स्वामीभक्त व भाविकांच्या उपस्थितीत महात्मा फुले नगर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाणीपेठ, गांधी चौक, पानगल्ली, गुजर आळी, पावसकर नाका, सोनार आळी, बाजारपेठ, हनुमान पेठ, कोष्टी आळी, संत रोहीदास नगर, संतसेना नगर, योगायोग सोसायटी मार्गे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर श्री भैरी भवानीनगर खेड येथील मंदिरात पालखी येऊन भोजनाच्या कार्यक्रमाने प्रकट दिन व पालखी सोहळ्याची सांगता झाली.
अत्यंत भक्तीमय वातावरणात आयोजित केलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी परिक्रमा सोहळ्यास नगराध्यक्षा माधवी बुटाला, राजू बुटाला, निकेतन पाटणे, पप्पू चिकणे, भाजपा नेते तथा मा. नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर या उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊन खेड शहरांतून निघालेल्या पालखी परिक्रमा सोहळ्यास सहभागी झाले.
या क्षणी संपूर्ण खेड शहर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांमुळेच आपल्या समाजात खऱ्या अर्थाने एकात्मता वाढीस लागते आणि एक नवी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या मंगलमयी सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तीचा आनंद लुटणाऱ्या भाविकांशी संवाद साधत तसेच या सुंदर सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक व स्वामी भक्तांचे आणि स्थानिक नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.




















.jpg)






























































































































































































































































































































.jpg)















6.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.