loader
Breaking News
Breaking News
Foto

तिवरे तर्फ देवळे येथे वणवा

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील तिवरे तर्फ देवळे येथील तिवरे वरचीवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे काजू बागेतून वणवा गेला असून अनेक बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. गेली तीन वर्ष या भागात असाच शॉर्ट सर्किटमुळे वणवा जात असून काजू बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. झाडावर चिकटून महावितरणच्या वायर जात आहेत त्या बदलून घ्याव्यात, अशी नुकसानग्रस्त शेतकरी मागणी करीत आहेत. झालेल्या नुकसानीला महावितरणच जबाबदार आहे, असे मत तिवरे तर्फ देवळे येथील शेतकर्‍यांनी व्यक्त केले आहे. राजकुमार सुर्वे, प्रकाश सुर्वे तसेच बौद्धवाडी येथील कांबळे कुटुंबीय यांचे गेले तीन वर्ष नुकसान होत असून यावर्षी ही नुकसान झाले आहे. महावितरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg