loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडी: जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांची 'नॅब' रुग्णालयाला सदिच्छा भेट

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील भटवाडी स्थित 'नॅब' (NAB) नेत्र रुग्णालयाला सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील अद्ययावत यंत्रणा आणि नॅबच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांची प्रशंसा केली. डॉ. पाटील यांनी रुग्णालयातील 'मॉड्युलर ऑपरेशन थिएटर' तसेच रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध असलेल्या 'ऑप्थल्मिक वॅन'ची पाहणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नॅब सिंधुदुर्ग करत असलेले सामाजिक कार्य उत्तम असून, येथील आधुनिक वैद्यकीय सुविधांचा जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला निश्चितपणे मोठा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ​या प्रसंगी सिव्हिल हॉस्पिटलचे अधिकारी ॲड. दिमाख धुरी, डॉ. मधु साळी, नॅब नेत्र रुग्णालयाचे तांत्रिक प्रमुख संतोष कदम, दिपाली कदम आणि नॅब चेअरमन अनंत उचगावकर उपस्थित होते. या सर्वांनी जिल्हा शल्यचिकित्सकांचे स्वागत करून त्यांना रुग्णालयातील कामकाजाची माहिती दिली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg