loader
Breaking News
Breaking News
Foto

बाबुराव धुरी यांच्या आंदोलन इशारा नंतर साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे चालक नियुक्ती

दोडामार्ग (प्रतिनिधी) - साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथील रूग्णवाहिकेवर २० एप्रिल पर्यंत चालक नेमणूक झाली नाही तर दोडामार्ग तालुका आरोग्य केंद्र कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित संस्था यानी दखल घेऊन साटेली भेडशी आरोग्य केंद्र रुग्णवाहिकेवर चालक म्हणून शंकर बाबाजी पार्सेकर याची नेमणूक केली आहे. बाबुराव धुरी यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथील रुग्णवाहिकेवर चालक नसल्याने मोठी गैरसोय होत होती. रूग्णांना पुढील उपचारासाठी हलवणे अशक्य झाले होते. याची माहिती बाबुराव धुरी याना समजताच संबंधित अधिकारी, कर्मचारी पुरवठा ठेकेदार कंपनी याना तातडीने लेखी पञ देऊन लक्ष वेधून घेतले होते. या नंतर चालक नेमणूक झाली, यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg