दापोली (प्रतिनिधी) - अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर रविवारी सायंकाळी उशिरा दापोली शहरात आयोजित केलेले ‘विशाल हिंदू संमेलन’ उत्साहात पार पडले. या हिंदू संमेलनाला जनसहभागाचा उस्फुर्त प्रतिसाद मिळालेल्या या संमेलनात समाजातील एकात्मता, कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व, संस्कृतीचे जतन आणि राष्ट्रभान जागवण्याचा संदेश या संमेलनातून देण्यात आला. दापोली शहरातील मराठा विद्यामंदिर च्या भव्य पटांगणात पार पडलेल्या या विशाल हिंदू संमेलनाला संगमेश्वर-धामणी येथील श्रीनिवास पेंडसे तसेच मुंबई येथील सुहास पोतदार यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. श्रीनिवास पेंडसे यांनी केलेल्या मार्गदर्शनात पारंपरिक कुटुंबपद्धतीचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी कुटुंबातील संवाद कमी होत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली. समाजात वाढत्या सामाजिक बदलांकडे लक्ष वेधत त्यांनी कुटुंबसंस्थेचे बळकटीकरण आवश्यक असल्याचे सांगत. ते म्हणाले भाषा आणि संस्कृतीचे जतन हे समाजाच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक असून भाषेच्या माध्यमातूनच संस्कृती जिवंत राहते, असे त्यांनी स्पष्ट केले.
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने समाजहिताचा संकल्प करण्याचे आवाहन करत वाढदिवसासारखे सणही पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याचा संदेश त्यांनी दिला. “मी आणि माझं कुटुंब” या विचारापलीकडे जाऊन “माझा समाज, माझं राष्ट्र” हा व्यापक दृष्टिकोन आत्मसात करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यानंतर सुहास पोतदार यांनीही आपल्या मार्गदर्शनात समाज जीवनातील मूल्यांवर प्रकाश टाकला. स्वबोध, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य आणि पर्यावरण या पंच परिवर्तनाच्या मुद्द्यांवर त्यांनी सखोल विवेचन केले. हिंदू संमेलन कार्यक्रमाची सुरुवात केळस्कर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून पालखी मिरवणुकीने झाली. श्रीराम ढोल पथकाच्या गजरात मिरवणूक निघाली. मुख्य कार्यक्रमात भारत माता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला.
या हिंदू संमेलनात दापोली शहरालगतच्या परिसरातील गावागावांतील महिला, पुरुष व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी दापोली पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता. या हिंदू संमेलन कार्यक्रमाचे संयोजक मिलिंद शेठ यांनी प्रास्ताविकात संमेलनामागील भूमिका स्पष्ट करत समाजातील ऐक्य वाढवण्याचा उद्देश असल्याचे सांगितले.




1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.