loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा उद्यापासून राज्यव्यापी बेमुदत संप; नोंदणी व मुद्रांक विभागाचाही सहभाग

प्रतिनिधी ​(सागर गोवळे) - राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 'राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र' यांच्यावतीने उद्या, २१ एप्रिल २०२६ पासून राज्यव्यापी लाक्षणिक बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये नोंदणी व मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटनेनेही सक्रिय सहभाग दर्शवल्याने सरकारी कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेने याबाबतचे अधिकृत पत्र सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत, नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचारी या संपात सहभागी होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नोंदणी व मुद्रांक विभागाचे कर्मचारी संपावर गेल्यामुळे दस्त नोंदणी (Registration), मुद्रांक शुल्क वसुली आणि संबंधित प्रशासकीय कामे ठप्प होण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका सामान्य नागरिक आणि रिअल इस्टेट क्षेत्राला बसू शकतो. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचारी आक्रमक झाले असून, जोपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. १३ एप्रिल २०२६ रोजी पुणे येथील महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक नियंत्रक यांना दिलेल्या निवेदनानंतर आता प्रत्यक्ष संपाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेते आणि सामान्य जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg