loader
Breaking News
Breaking News
Foto

ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामाला विलंब, ग्रामस्थांचे उपोषण

दोडामार्ग (प्रतिनिधी) - उसप गावात जाणाऱ्या पिकुळा तिठा ते उसप रस्ता ठेका घेतलेल्या संबंधित ठेकेदारकडून रस्ता मंजूर होऊन दोन वर्षे झाली, पावसाळा जवळ आला तरी काम पूर्ण नाही. कामाचा दर्जा योग्य नाही याबाबत लेखी तक्रार करूनही संबंधित अधिकारी ठेकेदारकडून काम पूर्ण करून घेत नाही. निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. चौकशी केली जात नाही, त्यामुळे उसप गावातील ग्रामस्थ यांनी उसप येथे तातडीने पारदर्शक काम करून रस्ता पूर्ण करावा, यासाठी उसप गावातील ग्रामस्थ, माजी सरपंच यांनी उपोषणाला सुरूवात केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पिकुळे तिठा ते उसप मुख्य रस्ताकाम दिरंगाई केली जात आहे. कामात कुठेही पारदर्शकता नाही. निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांचे लक्ष वेधून बेजबाबदार ठेकेदार याला पाठीशी घालत आहेत. असा आरोप उपोषण कर्ते यांनी केला आहे. उपोषण बाबत 20 दिवस अगोदर संबंधित अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन देखील संबंधित रस्ता कामात काही सुधारणा झाली नाही. गेल्या पावसाळ्यात मोठी गैरसोय झाली. एव्हाना हे काम पूर्ण झाले पाहिजे होते. पण कामचुकार बेजबाबदार ठेकेदारमुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg