खेड (प्रतिनिधि) - रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून लोटे परशुराम औद्योगिक वसाहत ओळखली जाते. या वसाहती मधील अनधिकृत बांधकामे आणि टपऱ्या लवकरच एमआयडीसीकडून हटविण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तशा लेखी सूचना लोटे परशुराम औद्योगिक वसाहत तसेच अतिरिक्त लोटे प्ररशुराम औद्योगिक वसाहती मधील अनधिकृत बांधकामे आणि टपरी धारकांना देण्यात आल्या आहेत. सात दिवसांच्या आत ही बांधकामे हटवावीत अन्यथा एमआयडीसीकडून ही बांधकामे निष्कासीत करून त्यासाठी येणारा खर्च या अनधिकृत बांधकामधारकांकडून तसेच टपरी चालकांकडून वसूल करण्यात येईल, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शासनाने औद्योगिक वसाहतीकरिता संपादन केलेल्या जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी या व भूमिपुत्रनी व्यवसाय थाटायचा म्हटलं तर ते बिरबलाच्या खिचडी सारखे होणार आहे. कारखान्यांपासून चार ते पाच किलोमीटरवर जाऊन टपरी टाकली तर तेथे ग्राहक कोण येणार हा प्रश्नही आहे ? शिवाय महामार्गाच्या चौपदरीकरण दरम्यान संपादन केलेल्या जागांवर हे भूमिपुत्र व्यवसाय करू शकत नाहीत. मग यांनी जायचे कुठे? असा सवालही या प्रकल्पग्रस्तांकडून केला जात आहे.




1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.