loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर दुर्गादेवी येथील लहानग्यांनी बनविला सुवर्णदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती

वरवेली (गणेश किर्वे) - दिवाळी आणि किल्ले यांचे अतूट नाते फार वर्षांपूर्वीचे आहे. दिवाळी सणाला किल्ले बनवणे ही प्रथा लहानग्यांकडून आजही जपली जातेय. दिवाळी सणासाठी गुहागर तालुक्यातील विविध गावांमध्ये मातीचे किल्ले बनवण्यात आले आहेत. त्यामध्ये गुहागर दुर्गादेवी येथील लहानग्यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती तयार केली असून सदरचा किल्ला पाहण्यासाठी गर्दी होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी या किल्ल्याची पाहणी करून लहान वयात किल्ले बनवणे ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा जतन करणाऱ्या बालगोपाळांचा येथोचित गौरव केला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनिल हळदणकर, तालुका सचिव प्रशांत साटले, अमित खांडेकर, सुजित गांधी, राहुल जाधव यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. गुहागर दुर्गादेवी वाडीतील पाडावे परिवार यांच्या घरासमोर सुवर्णदुर्ग किल्ला आयुष विरेश पाडावे, अथर्व विरेश पाडावे, आर्यन मुरलीधर पाडावे, वेदांत सुरेश पाडावे, रिया सुरेश पाडावे, सुशांत अमोल पाडावे, गणराज शशिकांत गोणबरे, प्रणित शिवराम गावडे या सर्व बालगोपाळानी बनविला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदरचा किल्ला बनविताना त्याचे दरवाजे, त्यावरील मंदिर, गुहा, तट-बुरुज, इतर अवशेष, पायथ्याचे गाव दाखवणे, त्या गडावर सुंदर-सुंदर मातीची चित्रे, मावळे, तोफा, शिवरायांच्या मातीच्या छोट्या-छोट्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. बाजारपेठांमध्ये तयार किल्लेही उपलब्ध आहेत. पण स्वतः दगड- माती जमवून किल्ला तयार करण्याची मजा काही वेगळीच असते. त्यामुळे मातीत खेळता खेळता मातीचे किल्ले बांधण्यासाठी वडीलधारी मंडळी लहान मुलांना मदत करत असतात. दिवाळीमध्ये घरोघरी उभारले जाणारे किल्ले. मातीचे किल्ले आणि दिवाळीचे एक अतूट नाते आपल्याकडे दिसून येते. किल्ले बनवणे ही आपल्या महाराष्ट्राची परंपराच आहे. आपल्या राज्यात किल्ल्यांना एक आगळेवेगळे स्थान आहे. हे ऐतिहासिक किल्ले त्या काळातील राजेमहाराजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात. इतिहासकालीन पराक्रम आणि संघर्षाची हे किल्ले प्रतीके आहेत.

टाइम्स स्पेशल

आजही अनेक कुटुंब दिवाळीच्या सुटीत अनेक किल्ल्यांना आवर्जून भेट देत असतात. त्यामुळे बच्चे कंपनीला गड-किल्ले काय होते? त्या काळात महाराष्ट्र कसा होता? राजे-महाराजे कोण होते? याची माहिती मिळावी हा उद्देश असतो. पुस्तकात पाहिलेले किल्ले प्रत्यक्षात पाहताना एक वेगळीच मजा येते. प्रत्यक्षात पाहिल्याने किल्ले अधिक चांगल्यारितीने समजतात. किल्ले बनवण्याचा उद्देश केवळ मनोरंजन किंवा खेळ नसून त्यामुळे आपल्यातील प्रयोगशीलतेला आणि कल्पकतेला वाट मिळते. त्या माध्यमातून अनेक नवनवीन संकल्पना सूचतात. दगड-मातीचे किल्ले बनवण्यात खूप मजा असते आणि यासाठी लागणारे साहित्यदेखील सहज मिळते. गड-किल्ला प्रत्यक्षात पाहिला असेल तर दिवाळीत किल्ला साकारणे अधिक सोपे जाते. प्रत्यक्ष किल्ला बनवताना त्या ठिकाणी केलेले निरीक्षण उपयोगी येते. यामुळे दिवाळीच्या काळात सगळीकडे बालगोपाळांनी बनविलेले किल्ले लक्ष वेधून घेत आहेत. बालगोपाळ दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी करत असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg