loader
Breaking News
Breaking News
Foto

फुरूस येथे १० हजार ७२० रुपयांचा विमल पान मसाला गुटखा जप्त!

खेड (वार्ताहर) - तालुक्यातील फुरुस येथील एका टेलरिंग दुकानात विनापरवाना विक्री करण्याच्या उद्दे्‌शाने ठेवण्यात आलेला १० हजार ७२० रुपयांचा विमल पान मसाला गुटखा जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता करण्यात आली. दापोली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा आदित्य हिरेमठ यांनी फिर्याद दाखल केल्यानुसार, खेड पोलिसांनी संशयित आरोपी वाहिद अब्दुल कादिर परकार (वय-५१ वर्षे, रा.फुरुस बौध्दवाडी, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा रजि.नं. ३३१/ २०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२३, २२३, २७५ सह अन्नसुरक्षा आणि मानक कायदा २००६ चे कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी वाहीद अब्दुल कादीर परकार (रा. फुरूस-बौध्दवाडी ) याने आपल्या फुरूस येथील टेलरिंग दुकानात १० हजार ७२० रुपयांचा विमल पान मसाला गुटखा हा नशाकारक असल्याचे तसेच शरीरास अपायकारक असल्याचे माहित असून देखील तो इतरांना सेवन करण्यास देण्याकरीता गैरकायदा, विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेल्या स्थितीत रंगेहाथ मिळून आला. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg