loader
Breaking News
Breaking News
Foto

शेर्ले सरपंच प्रांजल जाधव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

सावंतवाडी (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने शेर्ले सरपंच प्रांजल प्रशांत जाधव यांचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघाने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करण्याऱ्या व्यक्तीला दरवर्षी दिला जातो. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उतुंग कामगिरी करून समाजाचे कल्याण करण्यासाठी सतत धडपड करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या मध्ये शेर्ले सरपंच प्रांजल प्रशांत जाधव यांना सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे , कालभक्त श्रीमहंत डॉ. श्रीकांतदास धुमाळ महाराज उज्जैन, ग्रामसेवक नेते एकनाथ टाकणे यांच्यासह दिग्गज मान्यवरांच्या हस्ते व यादवराव पावसे पाटील, रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

टाइम्स स्पेशल

आमचे मार्गदर्शक खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या नावाचा उल्लेख करत सरपंच प्रांजल जाधव यांनी राज्यस्तरीय पुरस्कार हा माझा एकटीचा नसुन उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, शेर्ले गावाचा आहे. ज्यांच्या मुळे मी आहे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, माझे जन्मदाते आई वडील या सर्वाचा आहे असे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg