loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा येथे व्यवसाय करू न दिल्याने तरुणाची आत्महत्या; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

​सावंतवाडी (प्रतिनिधी): ​बांदा येथील आफताब कमरूद्दीन शेख (वय ३८, रा. मुस्लिमवाडी) या तरुणाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फुलांचे दुकान लावण्यावरून वारंवार होणाऱ्या अडवणुकीतून आलेल्या नैराश्यातून आफताब यांनी बुधवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ​घटना: बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी पहाटे आफताब शेख यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने बांदा, सावंतवाडी आणि त्यानंतर गोवा-बांबुळी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. ​आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ: आत्महत्या करण्यापूर्वी आफताब यांनी एक भावनिक व्हिडिओ बनवला होता. यामध्ये त्यांनी आपल्या मृत्यूसाठी बांदा शहरातील ५ जण जबाबदार असल्याचे स्पष्टपणे म्हटले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

व्यवसायाला (फुलांचे दुकान) परवानगी न मिळाल्याने कुटुंबाची हलाखीची परिस्थिती झाली असून, पत्नी-मुलांचे हाल होत असल्याचे सांगत त्यांनी 'माझ्या मुलांना सांभाळा' अशी भावनिक साद घातली होती. आठ महिन्यांपूर्वी 'फुलांवर थुंकल्याचा' आरोप करत काही तरुणांनी त्यांना दुकान लावण्यास अटकाव केला होता. आफताब यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला होता. ​गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी नातेवाईकांनी दर्शवल्यानंतर, मयताचा भाऊ अब्दुल रजाक कमरूद्दीन शेख यांच्या तक्रारीनुसार बांदा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी रविवार (२ नोव्हेंबर) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

टाइम्स स्पेशल

बांदा येथील निलेश पटेकर सावंत, बाबा काणेकर, गुरू कल्याणकर, हेमंत दाभोलकर आणि जय पटेकर या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून भारतीय दंड संहिता कलम १०८, ३५१(५) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांदा पोलीस पुढील तपास करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg