loader
Breaking News
Breaking News
Foto

कांगवई, गवळवाडी ग्रामस्थांची घरवापसी!

खेड (प्रतिनिधी)- दापोली तालुक्यातील कांगवई, गवळवाडी ग्रामस्थ आणि मुंबई ग्रामीण मंडळाची स्वगृही वापसी झाली असून, सर्व ग्रामस्थांनी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ना. योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. या प्रवेशादरम्यान उबाठाचे शाखा प्रमुख सुभाष साळवी यांचा देखील पक्षप्रवेश संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेना आणि व्यक्त केलेला विश्वास ही मोट एकत्र बांधत केलेला हा पक्षप्रवेश ग्रामस्थांसाठी विकासाचे प्रवेशद्वार नक्कीच खुले करील शिवसेना ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गावा-गावातील वाद मिटवून गेली २० वर्षे राजकारणात मी उभा आहे. १९९० साली जशी शिवसेना उभी होती, तशी शिवसेना नव्याने आपल्या कांगवई गावात उभी राहते आहे, याचे समाधान याप्रसंगी ना. योगेशदादा यांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंग महाडिक आणि अनिल पेडणेकर यांच्या घरी मंत्रीमहोदयांनी भेट दिली.

टाइम्स स्पेशल

या प्रंसंगी माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, तालुकाप्रमुख उन्मेश राजे, मुंबईतुन आलेले कांगवई, गवळवाडी गावचे चाकरमानी, ग्रामस्थ आणि मुंबई ग्रामीण मंडळाचे सभासद, जेष्ठ शिवसैनिक श्री. चंद्रकांतजी साळवी, शाखाप्रमुख सचिन जाधव, ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष किसन तटकरे, मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष रघुनाथ महागावकर, कांगवईच्या माजी सरपंच सुमनताई खेडेकर, शिवसेना पदाधिकारी, तोंडली गावचे ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg