loader
Breaking News
Breaking News
Foto

समाजसेवक शांताराम उर्फ बाळा गोसावी यांचे निधन

मालवण (प्रतिनिधी) - मसुरे मेढावाडी गावचे सुपुत्र, अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम उर्फ बाळा नारायण गोसावी (60 वर्ष ) यांचे रविवारी रात्री उशिरा मालवण येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले. सोमवारी सकाळी मुंबई मिरा रोड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबई महानगरपालिकामध्ये टाऊन प्लॅनिंग विभागात अधिकारी म्हणून ते काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. बाळा गोसावी यांच्या निधनाने मसुरे गावावर शोककळा पसरली आहे. शांताराम गोसावी हे बाळा या टोपण नावाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. निस्सिम साई भक्त म्हणून त्यांची परिसरामध्ये ओळख होती. कोरोना कालावधीत अनेक रुग्णांची सेवा करण्यासोबतच अनेक गरजवंत कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात उपलब्ध करून दिला होता. साईनाथ भक्त मंडळ मसुरे मेढा वाडीचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते. अनेक प्रशालेंच्या विविध गरजा आपल्या दानशूर व्यक्तिमत्त्वातून पूर्ण करून दिल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मसुरे गावाच्या सामाजिक, कला, क्रीडा,धार्मिक, पर्यटन, उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचे बहुमूल्य असे योगदान होते. कै. नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्टचे ते संस्थापक अध्यक्ष होते. अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष महाराष्ट्र कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष तसेच भटक्या विमुक्त जाती जमाती भारतीय जनता पार्टी सेलचे ते राज्य उपाध्यक्ष होते. विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले होते. साई पुण्यतिथी उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी मसुरे गावामध्ये अनेक समाजाभिमुख उपक्रम दरवर्षी राबविले होते. सिंधुदुर्गामध्ये राज्य, आंतरराज्य विविध कॅरम स्पर्धा पुरस्कृत करून सिंधुदुर्गातील क्रीडा प्रेमींना आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.

टाइम्स स्पेशल

प्रतिवर्षी मोफत आरोग्य शिबिरे भरवून सिंधुदुर्गा सहित महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णांना हक्काचा आधार मिळवून दिला होता. मुंबई महानगरपालिकेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावरती त्यांना अनेक राज्य आंतरराज्य पुरस्कार मिळाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, बहिणी असा मोठा परिवार असून भारतीय कॅरम ज्युनियर संघाचा माजी कर्णधार नॅशनल कॅरमपट्टू वरुण गोसावी आणि मिरा रोड येथील डॉक्टर नेहा गोसावी यांचे ते वडील होत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg