loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विजयाचा जल्लोष – भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात उत्सव

खेड (दिलीप देवळेकर) - भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. या विजयाचा आनंद खेड शहरातही उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपचे वैभव खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विजय उत्सव साजरा करत "भारत माता की जय" आणि "वंदे मातरम्" च्या घोषणांनी परिसर दुमदुमवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या आनंदात फटाक्यांची आतषबाजी करत महिला क्रिकेट संघाच्या या अभूतपूर्व यशाचे स्वागत केले. उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांनी संघातील खेळाडूंच्या जिद्दीचे आणि कामगिरीचे कौतुक करत अभिमान व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमास नंदकुमार साळवी, रहीम सईबोले, ऍड. मिलिंद नांदगावकर, नांदगावकर, राहुल पाटणे यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वातावरणात देशभक्तीचा रंग भरला होता आणि सर्वत्र आनंदाचा माहोल होता. महिला क्रिकेट संघाच्या या विजयामुळे खेड शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून देशभरात अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg