loader
Breaking News
Breaking News
Foto

खडी वाहतूक करणाऱ्या डंपर व बसची समोरासमोर भीषण धडक, 20 प्रवाशांचा मृत्यू

तेलंगणामधून एका मोठ्या रस्ते अपघाताची बातमी समोर आली आहे. सोमवारी सकाळी राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला. खडीने भरलेल्या डंपरने बसला धडक दिली, ज्यामध्ये खडीखाली गाडले जाऊन 20 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात खडी वाहून नेणारा डंपर ट्रकने रोडवेज बसला समोरून जोरदार धडक दिली. यामध्ये अनेक प्रवासी खडीखाली गाडले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसमध्ये बहुतेक विद्यार्थी आणि ऑफिसला जाणारे नोकरपेशा लोक होते आणि त्यापैकी अनेकांचा मृत्यू झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातात 18 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चेवेल्लाजवळ डंपर तेलंगणा रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (आरटीसी) च्या बसला धडकला, ज्यामुळे बसवर खडी पडली.या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या खानापूर गेटजवळ टीजीएसआरटीसी बस आणि ट्रकमध्ये अपघात झाला. ही घटना आज सकाळी घडली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो आहोत आणि अधिक तपास सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, तेलंगणाचे मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी या गंभीर रस्ते अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. एका अधिकृत निवेदनानुसार, तेलंगणाचे मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी टीजीएसआरटीसीच्या एमडी नागी रेड्डी आणि रंगारेड्डी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आणि जखमींना पुरेशी वैद्यकीय सेवा देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg