loader
Breaking News
Breaking News
Foto

कोतवली येथे पतीने केलेल्या मारहाणीत ७० वर्षीय पत्नी जखमी!

खेड (वार्ताहर) - तालुक्यातील कोतवली-समोरची भोईवाडी येथे क्षुल्लक कारणावरून पतीने केलेल्या मारहाणीत ७० वर्षीय पत्नी जखमी होण्याची घटना घडली. जखमी फिर्यादी चंद्रप्रभा चंद्रकांत लवंदे (वय-७०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी फिर्यादीचा पती चंद्रकांत लक्ष्मण लवंदे यांच्याविरोधात येथील पोलीस स्थानकात गुन्हा रजि. न. ३३०/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ प्रमाणे गुहा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रप्रभा लवंदे या कपडे धुण्याकरीता घरातील वॉशिंग मशिन पाण्याने भरत असताना त्यांचे पती आरोपी चंद्रकांत लवंदे हे तेथे आले व फिर्यादी चंद्रप्रभा यांना म्हणाले, घरातील वॉशिंग मशीन लावायची नाही, मी आजच दुरुस्त करून घेतली आहे. मशीन बिघडल्यावर ती दुरुस्त करण्याकरीता तुझा मुलगा मला पैसे देत नाही म्हणून माझ्या वॉशिंग मशीनला हात लावायचा नाही. समोरच्या नळावर जाऊन कपडे धू, असे म्हणाले.

टाइम्स स्पेशल

त्यावर फिर्यादी चंद्रप्रभा त्यांना बोलल्या की, आपला मुलगा शैलेंद्र हा तुम्हाला पैसे पाठवित असतो तरी तुम्ही वाडीतील लोकांकडे त्याची बदनामी करत असता, असे बोलल्याचा राग आल्यावर आरोपी चंद्रकांत याने त्याच्या हाताच्या थापटाने चंद्रप्रभा यांच्या गालावर मारहाण केली तसेच त्यांचा गळा पकडून ढकलून दिले व शिवीगाळी केली तसेच दरवाजाच्या बाहेर असलेल्या चुलीतील लाकूड घेऊन फिर्यादी चंद्रप्रभा यांना त्या लाकडाने डाव्या हातावर मारहाण करून दुखापत केल्याने त्या जखमी झाल्या आहेत. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg