loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड टाइम्स प्रतिनिधी संतोष घरटकर यांना मातृशोक

महाड (वार्ताहर) - ज्येष्ठ पत्रकार, दैनिक रत्नागिरी टाइम्स रायगड आवृत्तीचे महाड प्रमुख संतोष कृष्णा घरटकर यांच्या मातोश्री श्रीमती इंदूमती कृष्णा घरटकर यांचे गुरूवार दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचं वय ८५ वर्ष होते. श्रीमती इंदूमती घरटकर या अत्यंत शांत व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. श्रीमती घरटकर यांच्या पतीचे तरूण वयातच निधन झाल्याने संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यावेळी त्यांनी न डगमगता जिद्दीने आपली २ मुले व १ मुलगी हिचा स्वतः महाड शहरामध्ये घरकामं करून सांभाळ केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तिनही मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले. त्या अत्यंत मेहनती आणि कष्टाळू होत्या. त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी महाड तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरातील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक व पत्रकार, डॉक्टर, वकिल आदी. क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक तसेच सगेसोयरे व बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमती घरटकर यांच्या पश्चात मुलगा पत्रकार संतोष घरटकर, मुलगी शशिकला जोशी तसेच नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे दहावे शनिवार दि. ८ नोव्हेंबर रोजी व उत्तरकार्य मंगळवार दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या राहत्या घरी लाडवली ता. महाड येथे होणार आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg