loader
Breaking News
Breaking News
Foto

पाल फाऊंडेशन तर्फे रुग्णवाहिका व सीसीटीव्ही कॅमेरे लोकार्पणाचे

कर्जत (जयेश जाधव) - कर्जत नगरपरिषद हद्दीतील गुंडगे गावातील स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांना कोणत्याही वैद्यकीय आपत्यकालीन परिस्थिती रुग्णालयात पोहोचण्यात विलंब होऊ नये या उद्देशाने लालधारी पाल यांचे सुपुत्र विजय पाल आणि अजय लालधारी पाल यांच्या सहकार्याने त्यांच्या पाल फाउंडेशनच्या वतीने गुड शेफर्ड, कॉनव्हेंट स्कूल, गुंडगे कर्जत येथे संध्याकाळी ७.०० वाजता अजय लालजी पाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून " रुग्णवाहिका सेवा " जनतेच्या सेवेत समर्पित करण्यात आली, तर गुंडगे परिसरातील नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुंडगे विभागात बरेच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे " बसविण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे लोकार्पण सोहळा कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, मा. नगरसेवक अॅड संकेत भासे, सामाजिक कार्यकर्ते शरद दादा मोरे, मा. नगरसेवक विजय भाऊ हजारे, सुर्वे, शहर संघटक नदीम भाई खान, युवा सेना शहरप्रमुख सचिन भोईर, मा.नगरसेविका वैशाली मोरे, मा. नगरसेवक दिपक मोरे, रॉली विजय पाल, पंकज पवार, कविता म्हामुणकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी या पाल फाउंडेशन व पाल कुटुंबियांच्या कार्याबद्दल म्हणाले की, पाल फाऊंडेशनचा मुख्य उद्देश नेहमीच लोकांच्या हितासाठी कार्य करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत व आवश्यकतेनुसार वेळीच मदतीचा हात पुढे करणे हा आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना त्वरीत " वैद्यकीय सेवा व सुरक्षा प्रदान" होईल. तसेच भविष्यात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास हा उपक्रम एक प्रभावी उपाय म्हणून उभा राहील, यावर प्रकाश टाकला. तर पाल कुटुंबीयांनी समाजसेवा करून आयुष्यभर सेवा केली आहे. लालधारी शेठ पाल यांचे उपनगराध्यक्ष म्हणून केलेले कार्य व आता पाल फाउंडेशन च्या माध्यमातून करत असलेली जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे, जनतेची सेवा हाच यांचा संकल्प आहे. अजय - विजय ही दोन बंधू समाजसेवेचे व्रत घेऊन पुढे चालले आहेत, वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही कार्य करत असल्याचे कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

लालधारी शेठ हे मनमिळावू नेतृत्व आहे, संघर्षातून त्यांनी त्यांचे कुटुंब उभे केले आहे, प्रामाणिक कार्य ते करत आले असल्याने ईश्वरी शक्ती त्यांच्या पाठीशी आहे, त्यांचा मुलगा व पुतण्या अजय विजय हे उच्चशिक्षित नेतृत्व असून याचा फायदा शिवसेनेला होणार असल्याचे न त्यांनी सांगितले. जनसमुदायाशी जोडलेले पाल कुटुंब असल्याने त्यांच्या कुटुंबातील महिला नेतृत्व नगर परिषदेत जाऊन एक " विकासाचे व्हिजन " गुंडगे प्रभागात आपल्याला पाहण्यास मिळेल, असे मत व्यक्त करत अजय पाल व संदिप शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केक भरवून दिल्या, याप्रसंगी आदिवासी कुटुंबीयांना जेवणाची भांडी, गॅस शेगडी पाल फाउंडेशन तर्फे भेट देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

आम. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg