loader
Breaking News
Breaking News
Foto

दक्षता जनजागृती सप्ताह- नाचणे, निवळी, हातखंबा, झरेवाडी येथे जनजागृती

रत्नागिरी : दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ग्रामपंचायत नाचणे, निवळी बाजारपेठ, निवळी तिठा रिक्षा स्टँड, हातखंबा रिक्षा स्टँड झरेवाडी, पावस बसस्थानक, ग्रामपंचायत गोळप, एमआयडीसी रत्नागिरी व मिरजोळे येथे भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन करण्यात आले. 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. शासकीय लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिक वृत्तपत्र, केबल टिव्ही व आकाशवाणीव्दारे भ्रष्टाचार विरुध्द जनजागृती पर संदेश प्रसारित करण्यात आले. तसेच सोशल मीडियाव्दारे व्हॉटसअप ग्रुपवर भ्रष्टाचार विरुध्द जनजागृती पर संदेश प्रसारीत करुन तक्रारीकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांचेकडील फोन नं. ०२३५२-२२२८९३ आणि टोल फ्री क्रमांक १०६४ या क्रमांकाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास अविनाश पाटील, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि, (मो. क्र. ७५८८९४१२४७), मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक, लाप्रवि,, (मो. क्र. ९८७०४७४५३५), सुहास रोकडे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, (मो. क्र. ९०६७०३५९१०) यांना संपर्क साधावा अथवा acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर acbmaharashtra.net येथे किंवा ई-मेल आयडी acbratnagiri@gmail.com, dyspacbratnagiri@mahapolice.gov.in, फोन नं. ०२३५२-२२२८९३ आणि टोल फ्री क्रमांक १०६४ वर तक्रार नोंदवावी.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

लाच मागताहेत..१०६४ वर संपर्क करा

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg