loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची महाड भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट

महाड (प्रतिनिधी) - भाजपाचे वरिष्ठ नेते रायगड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर महाड येथे आले असता, त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या चवदारतळे येथील कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या कार्यालयासाठी आर्थिक मदत देखील जाहीर केली. महाड येथे होत असलेल्या आरपीआय पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे काल सायंकाळी महाड येथे आले असता, त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या चौदारतळे येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून रामशेठ ठाकूर यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान महाड गरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांची संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्या समवेत भाजपाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, वाय टी देशमुख, माजी जिप सदस्य अमित जाधव, पनव़ेल महापालिकेचे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना रामशेठ ठाकूर यांनी ऐतिहासिक महाड भूमीमध्ये भाजपाचे एक सुसज्ज व भव्य असे पक्ष कार्यालय असावे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली व त्यासाठी आपण दहा लाखाचा निधी देणगी स्वरूपात देत असल्याचे देखील त्यांनी यावेळी जाहीर केले.

टाइम्स स्पेशल

त्यांच्या या मदतीमुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याची भावना निर्माण झाली असून, रामशेठ ठाकूर यांनी मी सदैव तुमच्या सोबत आहे. कुठल्याही प्रकारची अडचण अथवा समस्या निर्माण झाल्यास मला संपर्क करावा, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला. या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष निलेश तळवटकर, जिल्हा उपाध्यक्षा मंजुषा कुद्रीमोती, उपाध्यक्षा कल्पना विचारे, माजी सरचिटणीस महेश शिंदे, भाजपाचे नपा चे उमेदवार सुमित पवार, शहर चिटणीस ॶॅड अदित्य भाटे, जिल्हा कार्यकारणी अक्षय ताडफळे, श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg