loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी पंचायत समितीकडून दिव्यांगांना १८ लाखाचा निधी

रत्नागिरी : राजकीय पक्षभेद न पाळता पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचल्या पाहिजेत या हेतूने रत्नागिरी पंचायत समितीच्या सेस फंडामधून चरितार्थ चालवण्यासाठी 63 दिव्यांगाना त्यांच्या पायावर उभे राहता येईल यासाठी 18 लाखांच्या निधीचे वाटप करण्यात आल्याची माहिती सभापती प्रवीण पांचाळ यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोमवारी रत्नागिरी पंचायत समितीमध्ये तालुकामधून आलेल्या 63 लाभधारकांना बोलवण्यात आले होते. यावेळी त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. सुमारे 18 लाखाच्या निधीचे वाटप करण्यात आले. पंधरा हजारापासून 60 हजारापर्यंत वस्तूंसाठी लाभ देण्यात आला. यामध्ये 17 जणांना झेरॉक्समशिनसाठी, शिलाई मशिनसाठी 9 जणांना तर घरघंटीसाठी 37 जणांना लाभ देण्यात आला. ज्या-ज्या व्यक्तींनी मागणी केली होती, योजनेत बसणाऱ्या सर्वांचाच यात समावेश करण्यात आला आहे. याबाबत बोलताना सभापती प्रवीण पांचाळ म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे कुणालाही या योजनेतून वगळण्यात आलेले नाही. अगदी पक्षिय राजकारण न बघता गोरगरीबांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टाइम्स स्पेशल

कागदपत्रांची छाननी करुन, या लाभधारकांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा केले जाणार असल्याचे पंचायत समिती गटविकास अधिकारी चेतन शेळके यांनी सांगितले. या लाभधारकांनी पैसे मिळाल्यानंतर वस्तू घेऊन, त्यांचे फोटो पंचायत समितीकडे जमा करायचे असून, अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपसभापती गजानन धनावडे यांच्यासह अधिकारी वर्ग व लाभधारक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg