संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - विशेषता कोकणामध्ये जाकडी नृत्य, खेळे, नमन, ढोल वादन, भारुड, अशा विविध लोककला पहायला मिळतात. त्यापैकीच एक पारंपरिक समजली जाणारी लोककला म्हणजे पालखी नृत्य कला! उठ सूट गावातून बाहेरगांवी जाणे व अशा पारंपारिक लोककलांकडे दुर्लक्ष होणे यासाठी पारंपारीक लोककला पालखी नृत्य कोकणात चांगल्या प्रकारे जोपासली जावी किंबहुना तरुण वर्गाला याची आवड होऊन सांघिक भावना वाढीस लागावी व यातून ढोल वादन, नृत्य, ठेका, ताल, निशान नृत्य, असे प्रकार जाणून घेऊन सराव व्हावा अशा अनेक हेतूने श्री धावबा बाकयजी सेवा संस्था केळवली (वरचीवाडी) तालुका लांजा या संस्थेकडून भव्य दिव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या पालखी नृत्य स्पर्धेमध्ये पौराणिक, ऐतिहासिक अध्यात्मिक आधी प्रकारांचे देखाव्यांचे सादरीकरण केले गेले. पहिल्या चार क्रमांकाला रोख रक्कम व सन्मान चिन्हांची पारितोषिके देण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक रू.११,१११/- बाल विकास पालखी नृत्य पथक पाटगाव कुंभारवाडी देवरुख हे मानकरी ठरले असून द्वितीय क्रमांकामध्ये रू.७,७७७/- सिद्धिविनायक पथक तोणदे रत्नागिरी, तृतीय क्रमांक रू.५,५५५/- श्री गांगोबा पथक करंबळे संगमेश्वर, चतुर्थ क्रमांक फ्रेंड्स ग्रुप विघ्रवली देवरुख तसेच उत्कृष्ट ढोल वादन सिद्धिविनायक पथक तोणदे रत्नागिरी, उत्कृष्ट निशाण नृत्य गणेश साळवी पाटगाव कुंभारवाडी देवरुख, उत्कृष्ट ताशा वादक निलेश साळवी पाटगाव कुंभारवाडी देवरुख अशाप्रकारे पथकाने आपली कला सादर करून पारितोषिके प्राप्त केली आहेत.




1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.