loader
Breaking News
Breaking News
Foto

समीर नलावडे यांचा विजय निश्चितः गोटया सावंत

कणकवली (प्रतिनिधी)- कणकवलीत समीर नलावडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेले काम आदर्शवत आहे. पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवलीचा झालेला विकास जनतेसमोर आहे. त्यामुळे कणकवलीच्या नगराध्यक्षपदी ८०० पेक्षा जास्त मताधिक्य घेत समीर नलावडे हे विजयी होतील. त्याचप्रमाणे आताच नगरसेवक पदाच्या भाजपच्या १४ उमेदवारांचा विजय निश्चित झाला असून अजून आमच्याकडे दोन दिवसाचा कालावधी आहे. या काळात उर्वरित तीन म्हणजे १७ पैकी १७ जागा भाजपा जिंकेल, असा विश्वास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी व्यक्त केला. जि. प. माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत हे निवडणुकीतील मास्टर माईंड म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांच्याकडे कणकवलीतील कठीण प्रभाग समजले जाणार्‍या चार प्रभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रभागातील प्रचारानंतर बोलताना ते म्हणाले, समीर नलावडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेले काम आदर्शवत आहे. नागरिकांनी मनापासून ठरवले तर जमीन नलावडे यांना मोठे मताधिक्य निश्चितपणे मिळेल. समीर नलावडे यांच्या विरोधात उभे असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे दहा वर्षे कणकवलीचे सरपंच होते आणि पाच वर्षे नगराध्यक्ष होते मग या काळात त्यांनी विकास का नाही केला? आताच त्यांना विकास कसा आठवला? त्यावेळी कणकवली विस्तारीकरणाचा प्रयत्न त्यांनी का नाही केला? असा सवाल करताना सावंत म्हणाले, समीर नलावडे यांच्या काळात अनेक रस्ते साकारले, मात्र तेली आळी दरम्यानचा रस्ता रोखण्यामध्ये हेच लोक पुढे होते. समीर नलावडे यांनी रस्त्यांसाठी जमिनी भूसंपादन करताना नागरिकांना योग्य मोबदला मिळवून दिला.

टाइम्स स्पेशल

खासदार नारायण राणे त्याचप्रमाणे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून अनेक कामे केली. निधी निधीची कमतरता भासली नाही मात्र विकासासाठी लागणारी जमीन मिळवणे हे मोठे स्किल आहे. जनतेच्या समस्या दूर करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून विकास साधावा लागतो, हे समीर नावडे यांना शक्य झाले असल्याने विकास कामे मार्गी लागली, त्यामुळे कणकवली जनता समीर नलावडे यांच्या पाठीशी आहे, असे गोट्या सावंत म्हणाले. जे स्वतःला उद्धव ठाकरे यांचे पाईक समजत होते, त्यांनी मशाल चिन्ह गोठवत नारळ हाती घेतला. राज्यात कुठेही घडले नाही ते कणकवलीत घडले. उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने ही दुर्दैवी बाब असून अशा लोकांच्या पाठीशी कणकवली जनता राहणार नाही, असेही गोट्या सावंत यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg