loader
Breaking News
Breaking News
Foto

कौन बनेगा नगराध्यक्ष? आज मतदान, जिल्ह्यात सर्व चुरशीच्या लढती

रत्नागिरी (वार्ताहर) : जिल्ह्यात चिपळूण, रत्नागिरी, खेड आणि राजापूर या ४ नगर परिषदा आणि गुहागर, देवरुख, लांजा या ३ नगर पंचायतींसाठी मंगळवारी २ डिसेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. ७ नगराध्यक्षपदासाठी लक्षवेधी लढती रंगल्या आहेत. खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूरमध्ये लक्षवेधी लढती होत आहेत तर गुहागर, लांजा आणि देवरुखच्या नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी चुरशीचा सामना रंगला आहे. खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीच्या उमेदवार माधवी बुटाला, महाआघाडीच्या सपना कानडे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सीमा जाधव यांच्यात लढत होणार आहे. २० नगरसेवकांसाठी बहुरंगी सामना रंगला आहे. सार्‍या जिल्ह्यात अतिशय लक्षवेधी अशी लढत चिपळूण नगर परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी रंगणार आहे. चिपळूणचे जाणते राजे म्हणून ज्यांना ओळखले जाते ते माजी नगराध्यक्ष रमेशराव कदम हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राजू देवळेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्याचप्रमाणे कॉंग्रेसच्यावतीने सुधीर शिंदे रिंगणात असून कॉंग्रेसचे आणखी एक नेते लियाकत शहा हे अपक्ष म्हणून लढत आहेत. महायुतीचे उमेदवार उमेश सकपाळ, समाजवादी पक्षाचे मोईन पेचकर आणि अपक्ष उमेदवार निशिकांत भोजने असे एकूण ७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिपळूणप्रमाणेच रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पदासाठीही ६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. रत्नागिरीतही चुरशीचा सामना पहायला मिळत आहे. शिवसेना-भाजपा महायुतीच्या सौ. शिल्पा सुर्वे यांच्या विरोधात राज्यातील महायुतीच्या सत्तेमध्ये असणार्‍या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने सौ. वहिदा मुर्तुझा यांनी रिंगणात उडी घेतली आहे. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सौ. शिवानी राजेश सावंंत - माने या रिंगणात उतरल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या उमेदवार सुश्मिता शिंदे याशिवाय संध्या कोसुंबकर आणि प्राजक्ता किणी या दोन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. राजापूर नगर परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी ३ उमेदवारांनी रिंगणात उडी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून कॉंग्रेसच्या नेत्या आणि माजी आमदार तसेच माजी नगराध्यक्षा सौ. हुस्नबानू खलिफे यांच्या विरोधात महायुतीच्या श्रुती ताम्हणकर यांच्यात सामना रंगला आहे. हिंदू महासभेच्या ज्योती खटावकर या देखील आपले भाग्य अजमावत आहेत. नगर पंचायती निवडणुकांमध्ये लांज्यात महायुतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चुरस पहायला मिळत आहे. लांज्यामध्ये महायुतीच्या वतीने शिवसेनेच्या सावनी सुनील कुरुप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार पूर्वा मुळे यांच्याशी होणार आहे. प्रियांका यादव यादेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून ही तिरंगी लढत यामुळे चुरशीची झाली आहे. देवरुख नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी पाचजणी रिंगणात आहेत. त्यामध्ये विद्यमान नगराध्यक्षा आणि भाजप महायुतीच्या उमेदवार मृणाल अभिजीत शेट्ये यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवार सबुरी थरवळ, आम आदमी पक्षाच्या दीक्षा खंडागळे, अपक्ष-स्मिता लाड आणि अपक्ष-वैष्णवी मोरे यांचा समावेश आहे.

टाइम्स स्पेशल

गुहागर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये भाजप-सेना युतीच्या उमेदवार नीता विकास मालप, शिवसेना उबाठाच्या पारिजात कांबळे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाच्या सौ. सुजाता बागकर आणि अपक्ष उमेदवार ऍड. सौ. सुप्रिया वाघधरे यांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg