loader
Breaking News
Breaking News
Foto

ओंकार पतसंस्थेच्या कथित गैरव्यवहारास व्यवस्थापक वासंती निकम दोषी असल्याचा ठपका

देवरूख (सुरेश सप्रे) - देवरूखातील अग्रगण्य असलेल्या ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, देवरूख, ता.संगमेश्वर, जि. रत्नागिरी या संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहार करून संस्थेच्या नुकसानीस चौकशी अधिकारी इंगळे यांनी दीलेल्या अवहालात व्यवस्थापक वासंती निकम यांना जबाबदार ठरवत दोषी ठरवले आहे. पुर्वी या पतसंस्थेतील गैरव्यवहाराची एका चौकशी अवहालात तात्कालीन संचालक मंडळालला दोषी ठरवत सर्व रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. त्यावर संचालक मंडळाने या निर्णयास आव्हान देत सदरचा आदेश रद्द करून फेर चौकशी करणेसाठी मागणी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ व नियम १९६१ चे नियम ७२ नुसार या फेर चौकशीसाठी अविनाश इंगळे, प्राधिकृत चौकशी अधिकारी तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था, राजापूर जि. रत्नागिरी संदर्भ क्र. १ अन्वये प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. प्राधिकृत चौकशी अधिकारी, ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. देवरूख, ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, राजापूर यांनी अधिनियमाच्या कलम ८८ अन्वये आपला चौकशी अहवाल संदर्भ क्र. २ अ कार्यालयाकडे सादर केला. त्यानुसार प्राधिकृत चौकशी अधिकारी, यांचे चौकशी अहवालाची छाननी केली असता दोन कोटी तीन लाख सत्तावीस हजार सहाशे सत्तर रू. (२,०३,२७,६७०/-) इतक्या रक्कमेचा गैरव्यवहार झालेला असून तत्कालीन सचिव वासंती अनिल निकम याच सदरच्या गैरव्यवहारास जबाबदार आहेत असे आदेशात नमूद केले आहे.

टाईम्स स्पेशल

तरी उपरोक्त अधिनियमाच्या कलम ८८ अन्वये तात्कालिन व्यवस्थापक वासंती निकम यांचे जबाबदारी निश्चित करत गैरव्यवहार रक्कम दोन कोटी तीन लाख सत्तावीस हजार सहाशे सत्तर २,०३,२७,६७०/- अधिक गैरव्यवहार व्यवहार झालेचे तारखेपासून रक्कम भरणा करणेपर्यंत १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज यासह होणारी रक्कम संस्थेत भरणा करून घ्यावी असे आदेश दिले आहेत. अन्यथा सदर रक्कम ही जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९८ (ब) अन्वये वसूली प्रमाणपत्र का देण्यात येवू नये? या बाबतचा खुलासा करावा अशी नोटीस वासंती निकम यांना बजावली असून नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांचे या कार्यवाहीबाबत आपणास काही लेखी अथवा तोडी खुलासा करावयाचा असल्यास दि. १६/१२/२०२५ रोजी सकाळी ११.३० वा. यांचेसमोर उपस्थित रहावे. अशी नोटीस सह्हायक निबंधक सहकारी संस्था देवरूख यांनी बजावली आहे. उपरोक्त दिवशी व वेळी अथवा तत्पूर्वी आपण आपला खुलासा सादर न केल्यास उपरोक्त कारवाईबाबत आपणास काही एक म्हणावयाचे नाही असे समजून कायदयातील तरतुदीनुसार आपल्या स्थावर मालमत्तेच्या जप्तीची कारवाई प्रस्तावीत करण्यात येईल याची गांभीर्यान नोंद घ्यावी. असे स्पष्ट आदेश नोटीसीव्दारे साहेबराव पाटील सहायक निबंधक, सहकारी संस्था, संगमेश्वर (देवरूख), यांनी दीले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg