loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीच्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटचे (शहर) क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश

रत्नागिरी (जमीर खलफे) - मिलाग्रिस स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे जुबली चषकासाठी नुकत्याच झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये रत्नागिरीच्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलने (शहर) उज्ज्वल यश संपादन केले. या स्पर्धेसाठी संस्था अंतर्गत विविध शाळेतील संघांना आमंत्रित केले होते. विविध क्रीडा प्रकारात जवळपास एकूण १२ शाळा सहभागी झाल्या होत्या. सावंतवाडी या ठिकाणी व्हॉलीबॉल व बास्केटबॉल या दोन क्रीडा प्रकारात कॉन्व्हेंट हायस्कूलला विजेतेपद प्राप्त झाले. सामने अतिशय चुरशीचे झाले होते शेवटपर्यंत टिकण्यासाठी मेहनत व कष्ट घ्यावे लागले. निश्चितच विद्यार्थ्यांनी आजपर्यंत केलेल्या कष्टाचे चीज या ठिकाणी झाले व शाळेला घवघवीत यश प्राप्त झाले. विविध क्रीडा प्रकारातील सामने पाहताना मुलांनी आनंद घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिलाग्रिस सावंतवाडी शाळेने उत्कृष्ट नियोजन व खेळाडूंना चांगले सहकार्य केले. दोन्ही संघ मिळून शाळेतील एकूण वीस मुले सहभागी झाली होती. सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलच्या (शहर) मॅनेजर सिस्टर आफरा, सुपरवायझर सिस्टर नी, मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या सर्वांनी यशस्वी खेळाडूंचे मोठ्या उत्साहात स्वागत करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळातील यशामध्ये मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट व क्रीडा शिक्षक समीर निकम व पंकज जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg