loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर तालुक्यातील बागवेवाडी येथील बीएसएनएल टॉवर अखेर जनतेसाठी खुला

राजापूर (प्रमोद तरळ) - तालुक्यातील मौजे बागवेवाडी येथील बीएसएनएल टॉवर अखेर ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी सुरू झाला असून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कित्येक वर्षापासून नेटवर्कसाठी वंचित असलेल्या बागवेवाडीने बीएसएनएल टॉवरच्या रूपाने विकासाचे अजून एक पाऊल टाकले आहे. विद्यमान आमदार किरण सामंत आणि जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील मोबाईल नेटवर्क तातडीने करावे असे अधिकार्‍यांना सांगितले. गावातील ग्रामस्थ बालमित्र मंडळाचे अध्यक्ष कमलेश गांगण यांनी लगेचच माहिती घेत किरण सामंत तसेच जिल्हाधिकारी रत्नागिरी, राजापूर यांच्याकडे धाव घेतली आणि कामाचा पाठपुरवठा करत तातडीने सर्व्हे करण्यास सांगितला. सरपंच कु.नीलमताई हातणकर यांनी लागणारी कागदपत्रे वेळोवेळी राजापूर कार्यालयामध्ये सुपूर्द केली आणि स्थानिक ग्रामस्थांशी संपर्क साधला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर सर्व प्रक्रियेमध्ये प्रशांत कुलकर्णी बीएसएनएल अधिकारी, सौ.अदिती नार्वेकर (भू कर मापक अधिकारी), श्री.रसाळ (बीएसएनएल अधिकारी रत्ना. डिव्हिजन), श्री.शिरसाट (रत्ना. डिव्हिजन), बागवेवाडी उत्कर्ष मंडळ मुंबई, मुंबईस्थित आणि गावातील सर्व ग्रामस्थ आदी सर्वांचे सहकार्य लाभले. सर्व्हेसाठी लगतचे जमीन मालकांनी सुद्धा मोलाचं योगदान दिले. आमदार किरण सामंत तसेच सर्व अधिकारी वर्ग, मुंबईस्थित आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याबद्दल यावेळी आभार मानण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg