loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी येथे एका विशेष कलाकौशल्यपूर्ण व्यावसायिक प्रदर्शनाचा आज शुभारंभ

रत्नागिरी - आजपासून रत्नागिरी येथे एका खास, विशेष अश्या व्यावसायिक प्रदर्शनाचा शुभारंभ होत आहे. हे प्रदर्शन जोगळेकर संकुल हॉल, दामले विद्यालय रोड, रत्नागिरी येथे भरवण्यात आले असून येथे विविध क्षेत्रातील अनेक उद्योजक सहभागी झाले आहेत. नवीन उत्पादने, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक व जागतिक दर्जाचे सामान यांचा संगम येथे पाहायला मिळणार आहे. प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलमध्ये मेहनत, नवकल्पना आणि गुणवत्ता दिसून येईल. हे प्रदर्शन खरेदीसह ज्ञान, प्रेरणा व नेटवर्किंगची संधी देणारे ठरणार आहे. लघुउद्योग व नवोदित उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. त्याचबरोबर ग्राहकांना दर्जेदार व नाविन्यपूर्ण उत्पादने येथे एकाच छताखाली आणि तेही अगदी माफक दरात मिळतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येथे तुम्हाला मिळेल... कला-कौशल्यपूर्ण हस्तकलेच्या वस्तू, वॉल क्लॉक्स, तोरणे, हर्बल कॉस्मेटिकस, गिफ्ट आर्टिकल्स, पेंटिंग्ज, गृहसजावटीच्या वस्तू, आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स, त्याचबरोबर उत्कृष्ठ साड्या, ब्लॉऊजेस, बॅग्स आणि पर्सेस, किड्सवेअर आणि अस्सल कोकणी उत्पादने, मसाले आणि घरगुती खाद्यपदार्थ आणि बरंच काही तेही अगदी माफक दरात! हे प्रदर्शन ५, ६ आणि ७ डिसेंबर २०२५ रोजी जोगळेकर संकुल हॉल, हॉटेल अतिथी समोर, दामले विद्यालय रोड, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे सुरु असून प्रदर्शनाला भेट देण्याची वेळ सकाळी ११ ते रात्रौ ९ अशी आहे.

टाइम्स स्पेशल

ग्राहकांना सर्वोत्तम खरेदीसाठी आणि लघुद्योजकांना त्यांच्या व्यवसायवाढीसाठी एक उत्कृष्ठ असं व्यासपीठ निर्माण करून देत आयोजक सौ. पल्लवी व श्री. अलंकार डंबे यांनी सर्व नागरिकांना प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg