loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सरासरी ६५ टक्के शांततेत मतदान

चिपळूण (वार्ताहर) -नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात सरासरी ६५ टक्के इतके मतदान झाले. गोवळकोट रोड येथे सकाळी काही किरकोळ विषयावरून तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळली, त्यामुळे तणाव निवळला आणि नंतर मात्र दिवसभर खेळीमेळीच्या वातावरणात मतदान पार पडले. परंतु मोठा पोलीस बंदोबस्त येथे तैनात ठेवण्यात आला होता. संध्याकाळी मतदानाची वेळ संपली तेव्हा ६५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. चिपळूण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. त्यासाठी शहरात एकूण ४८ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. महाराष्ट्र हायस्कुल येथे सखी मतदान केंद्र तर बांदल हायस्कुल येथे आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते.नगरपरिषदेच्या एकूण २८ जागांसाठी ११० तर नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांची संख्या पाहता मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळी मतदानाला सुरुवात झाली तेव्हा अतिशय संथ गतीने मतदान सुरू झाले. पहिल्या दोन तासात फक्त १० टक्के मतदान झाले होते. नंतर मात्र मतदारांचा उत्साह चांगला दिसून येत होता. पेठमाप येथील केंद्रावर तर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. गोवळकोट गावात देखील मतदारांचा मोठा उत्साह होता. मोठ्या संख्येने मतदार केंद्रावर येत होते. गोवळकोट रोड येथील केंद्रावर मात्र मतदारांचा उत्साह काहीसा कमी होता.दुपारी १.३० वाजेपर्यंत एकूण ४० टक्के इतके मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाची गती काहीशी कमी झाली.३.३० वाजेपर्यंत ५३ टक्के इतके मतदान झाले.नंतर मात्र पुन्हा मतदारांनी उत्साह दाखवला प्रत्येक केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या.त्यामुळे मतदान मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्हे दिसून येत होती.

टाइम्स स्पेशल

संध्याकाळी ५ नंतर मतदानाचा ओघ पुन्हा वाढला. काही मतदार स्वतःहून येत होते, तर काहींना आणले जात होते. प्रत्येक बूथवर उमेदवार तसेच पक्षाचे कार्यकर्ते ठाण मांडून होते. तर प्रशासकीय यंत्रणा देखील योग्य प्रकारे काम करताना मतदारांचा सन्मान करत होते. गोधळ किंवा गडबड असे प्रकार नव्हते. मतदार खुल्या वातावरणात मतदान करत होते. परंतु मतदारांची नावे दुसर्‍या प्रभागात गेल्याने मतदारांवर हेलपाटे मारण्याची वेळ काही ठिकाणी आली. त्यामुळे नाराजी व्यक्त होत होती. ५.३० वाजता मतदानाची वेळ संपली तेव्हा अनेक केंद्रावर मतदारांच्या रांगा होत्या. त्यामुळे उपस्थित सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी वेळ देण्यात आला. काही मतदान केंद्रावर ६ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. अखेर सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासनाकडून देण्यात आला. अंतिम आकडेवारी देण्यास उशीर होणार असल्याचे सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg