ठाणे (प्रतिनिधी) — ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेची शाश्वतता, जलस्रोतांची सुरक्षितता आणि प्रभावी पाणी व्यवस्थापन या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषद, ठाणेद्वारे जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर व्यापक प्रशिक्षण कार्यक्रमास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमधील प्रत्येकी ५ प्रतिनिधी या प्रशिक्षणात सहभागी होत आहेत. याप्रमाणे एकूण २ हजार १५५ प्रशिक्षणार्थी आहेत. हा प्रशिक्षण कार्यक्रम १ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ३५ बॅचेस मध्ये घेण्यात येत आहे. प्रभावी पाणी व्यवस्थापनासाठी जलस्रोतांची सुरक्षितता आणि शाश्वतता एकत्रितपणे साध्य करणे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्यांची संस्थात्मक क्षमता वाढविणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाद्वारे समिती सदस्यांना पाणीपुरवठा योजनांचे नियोजन, अंमलबजावणी, देखभाल, स्त्रोत बळकटीकरण, जल गुणवत्तेची काळजी आणि दीर्घकालीन शाश्वतता याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रम हिमालय इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायर्नमेंट ऍण्ड डेव्हलपमेंट, डेहराडून (उत्तराखंड) या मुख्य संसाधन केंद्रामार्फत घेतला जात आहे. राज्य स्तरावरील या मान्यताप्राप्त संस्थेच्या तज्ज्ञ प्रशिक्षणकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात असून संपूर्ण कार्यक्रम जिल्हा परिषद, ठाणे यांच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण क्लस्टर लेव्हल वर आयोजित करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील ग्रामपंचायतींना जवळच्या ठिकाणी प्रशिक्षण घेता येणार आहे. भारत सरकारने २०१९ मध्ये सुरू केलेले जल जीवन मिशन हे ग्रामीण भारताच्या पाणीपुरवठा क्षेत्रातील क्रांतिकारक अभियान आहे. याचा उद्देश ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक घरगुती नळ कनेक्शन च्या माध्यमातून सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सतत उपलब्धता, सार्वजनिक आरोग्यात सुधारणा, महिला व मुलींवरील पाणी भरण्याचा भार कमी होणे, सामाजिक-आर्थिक विकासास गती, ग्रामपंचायती आणि स्थानिक समितींचा सक्रिय सहभाग यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.
JJM हे समुदाय-चलित अभियान असून, ग्राम पाणीपुरवठा व्यवस्थापनात ग्रामीण भागातील समित्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण मानला जातो. जल जीवन मिशन अंतर्गत स्तर 3 (L3) प्रशिक्षणातील टप्पा-4 मध्ये ग्रामपंचायत स्तरावरील 5 प्रतिनिधींच्या गटाला खास “स्त्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण” या विषयावर प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणामुळे ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत सदस्यांची क्षमता वाढेल, जलस्रोतांची सुरक्षितता, संवर्धन आणि शाश्वतता सुनिश्चित होईल, गावातील पाणीपुरवठा योजनांचे दीर्घकालीन व्यवस्थापन परिणामकारक होईल, गावस्तरावर पाणी व्यवस्थापनात स्वयंपूर्णता वाढेल, जलस्रोत टिकवून ठेवणे, पाण्याचे योग्य नियोजन व वापर, पाणलोट क्षेत्र विकास इत्यादींबाबत व्यवहार्य कौशल्य प्राप्त होईल. जिल्हा परिषद, ठाणे यांच्यावतीने या प्रशिक्षणाद्वारे जल जीवन मिशनच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी होऊन ग्रामीण भागातील जलस्रोतांची शाश्वतता, सुरक्षितता आणि पाणीपुरवठा व्यवस्थेची गुणवत्ता अधिक मजबूत होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.