loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात आज दत्तजयंती उत्सव, भजनाच्या मंगल स्वरांनी परिसर दुमदुमणार

रत्नागिरी (वार्ताहर) - रत्नागिरीतील सुप्रसिद्ध प्राचीन व पुरातन अशा श्रीराम मंदिराच्या प्रांगणातील श्री गुरूदेवदत्त मंदिरात श्री दत्तजयंती उत्सव आज गुरूवार दि.४ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने मंदिर भजनाच्या मंगल स्वरांनी दुमदुमणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दत्तजयंती उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज गुरूवारी दि.४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. श्री गुरूदेव दत्त यांची षोडशोपचारे पुजा, अभिषेक व आरती करण्यात आली. त्याचे यजमानपद विश्वस्त, सरचिटणीस सौ. व श्री. सुनिल नलावडे यांनी भूषविले. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी १० वा.पासून विविध नामवंत भजन मंडळे आपली सेवा श्रीदत्त चरणी सादर करणार आहेत. स.१० वा. श्रीराम भजन मंडळ, श्रीराम आळी, रत्नागिरी (बुवा आप्पा घोसाळकर, मनोज भाटकर, हिरकांत साळवी, रमाकांत पांचाळ, राजेंद्र भाटकर, साळवी, शेलार, कदम, सागवेकर, साटेलकर, सनगरे, सावंत, दामले, सतिश पांचाळ, पखवाज श्री. लिंगायत आदी मंडळींनी सेवा सादर केली. दुपारी १२ वा.श्री अनिरूद्ध महाराज उपासना सेवा मंडळ रत्नागिरी यांचा श्रीदत्त स्तोत्र पठण कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी २ वा. श्री एकमुखी दत्त प्रासादिक महिला भजन मंडळ घुडेवठार (गायिका सौ. प्रेरणा विलणकर, पखवाज श्री. रमाकांत पांचाळ/भाटकर) यांचे भजन होईल. सायं.३.३० वा.श्री स्वामी समर्थ माऊली महिला भजन मंडळ रत्नागिरी (गायिका सौ. मानसी साळवी, वेदा शेट्ये, प्रेरणा विलणकर, समिक्षा वालम, पूनम गोळपकर, विनया काळप, रेश्मा शिंदे, अर्यना मयेकर, मनिषा नाचणकर, स्मिता नाचणकर, पखवाज श्री. रमाकांत पांचाळ/भाटकर) आपली सेवा सादर करतील. साय.५ वा. श्री दत्त जन्मोत्सवाचे किर्तन प्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प. प्रविण विठ्ठल सावंत देसाई (रत्नागिरी) हे सादर करतील. त्यांना हार्मोनिअमवर राजेश सावंत साथ देतील तर तबला साथ अर्थव घाणेकर हे करतील.

टाइम्स स्पेशल

त्यानंतर जन्मकाळ झाल्यानंतर भगिनी पाळणा गातील व श्री दत्तजन्मोत्सव साजरा करतील. भाविकांना सुंठवडा, प्रसाद वाटप करण्यात येईल. रात्रौ ७.३० वा. आरतीने उत्सवाची सांगता होईल. तरी सर्व भाविकांनी भगिनीनी या सर्व कार्यक्रमाचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा व सर्वांनी या आनंद सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी दत्तजन्म पाळणा गाणार्‍या महिलांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg