loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी प्रभाग ३ मधून श्री. राजन शेट्ये व सौ. प्रिती सुर्वे यांना विजयी करण्याचे आवाहन

रत्नागिरी न.प. प्रभाग ३ मधून ज्येष्ठ नगरसेवक श्री. राजन शेट्ये व सौ. प्रिती सुर्वे हे शिवसेना, भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. हे दोन्ही उमेदवार अनुभवी व कर्तबगार असल्याने त्यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात फार मोठी आघाडी संपादन केली असल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. बिपीन बंदरकर यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, ‘‘श्री. राजन शेट्ये यांनी यापूर्वी रत्नागिरीचे उपनगराध्यपद भुषविले आहे. ते एक अभ्यासू,सचोटीचे व जनहितदक्ष नेते म्हणून ओळखले जातात. अतिशय सौजन्यशील स्वभावामुळे त्यांचा लोकसंग्रह फार मोठा आहे. रत्नागिरी न.प.मधील सर्वात ज्येष्ठ नगरसेवक म्हणून त्यांना सर्व राजकारणी नेते फार मोठा मान देतात. ते जनतेची लहानमोठी सर्व कामे तत्परतेने करीत असतात. रत्नागिरी प्रभाग ३ मध्ये त्यांनी संसारे गार्डनसह अनेक विकास कामे पूर्ण करुन घेतली आहेत. कुणी नागरिक अडचणीत असेल तर ते रात्री बेरात्री देखील मदतीसाठी धावून जातात हे त्यांचे वैशिष्टय होय.’’

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री. बिपीन बंदरकर यांनी पुढे सांगितले, ‘‘प्रभाग ३ मधील शिवसेना व भाजपा महायुतीचे दुसरे उमेदवार सौ. प्रिती रविंद्र सुर्वे या देखील न.प.मधील एक ज्येष्ठ नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी रत्नागिरी न.प.मध्ये सभापतीपद कार्यक्षमपणे भुषविले आहे. रत्नागिरीतील प्रतिथयश उद्योजक श्री. रविंद्र सुर्वे यांच्या त्या सौभाग्यवती होत. त्यांनीही प्रभाग ३ मध्ये अनेक विकास कामे केली आहेत. कुणा नागरिकाचे काम निघाले तर त्या तत्परतेने धाव घेतात व काम करुन देतात. त्यांचा जनसंपर्क फार मोठा आहे.’’

टाइम्स स्पेशल

रत्नागिरी प्रभाग ३ मधील शिवसेना, भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. राजन शेट्ये व सौ. प्रिती सुर्वे यांच्या पाठीशी शिवसेना व भाजपा हे दिग्गज पक्ष उभे आहेत. हे दोघेही उमेदवार प्रशासन कुशल व अनुभवी नेते म्हणून सुपरिचित आहेत. शासन यंत्रणेकडून नागरिकांची कामे सुलभरित्या कशी करुन घ्यावीत हे त्यांना बरोबर ठाऊक आहे. त्यांना सर्व मतदार बंधू भगिनींनी आपली मते देऊन मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे’’ असे आवाहन त्यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg