loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात संपन्न

खेड (प्रतिनिधी) - दिव्यांग युवा क्रिडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्यावतीने जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या पदाधिकारी यांनी खेड येथील अनुग्रह विशेष शाळा वेरळ या शाळेला भेट देऊन तेथील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या करता शाळेच्या वतीने दिव्यांग मुलांच्या नृत्य व गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग असून देखील सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर अशा गायनाचे व नृत्यांचे प्रदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हाध्यक्ष प्रशांत सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना दिव्यांग व्यक्तीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. दिव्यांगाना सहानुभूती नको तर त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांना पुढे जाण्यासाठी सहकार्य करा प्रत्येक व्यक्तीकडून समानतेचा हक्क व सन्मानाची गरज आहे तेव्हाच त्यांच्यातील क्षमता आपोआप दिसेल. अनुग्रह शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी जे कष्ट घेत आहेत ते खूप कौतुकास्पद आहे, असे मत व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने अल्पोपहारचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी पांडुरंग नाचरे, हर्षद चव्हाण, सागर आईनकर, राजेश धारिया, संतोष मालशे, अल्पेश जंगम, शाळेचे संचालक फादर जोसेफ, मुख्याध्यापिका शेर्ली जॉर्ज, शिक्षक महेश जाधव, गंगाराम आखाडे, सरिता टिकम, आश्विनी कदम, अन्ना मारिया, ल्यूसी मारिया, कुंदा कावणकर, प्रेरणा विठमल, सचिन आखाडे, दिपाली हेगीष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg