loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा लकरकोट येथे श्री दत्त जयंती उत्सव

बांदा (प्रतिनिधी) -बांदा लकरकोट येथील श्री दत्त मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा मंदिराचा जिर्णोद्धार झाल्यामुळे श्री दत्त भक्तांचा उत्साह द्विगुणित आहे. या सोहळ्यानिमित्त गुरुवार दि.४ व शुक्रवार दि. ५ रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रम पत्रिका पुढील प्रमाणे आहे. गुरुवार दि.४ रोजी सकाळी ५.०० वा. काकड आरती व षोडशोपचार पुजा, सकाळी ८.०० वा. श्रीदत्त महाराजांची महापूजा, सार्वजनिक अभिषेक, सकाळी ९.०० वा.- श्री सत्यनारायण महापुजा. दुपारी १.०० वा. महानैवेद्य, महाआरती व सामुहिक गाऱ्हाणे, दुपारी १.३० वा. - महाप्रसाद, सायं. ५.०० वा. - श्री दत्तजन्म सोहळा व किर्तनकारः- ह.भ.प. ऋचा संजय पिळणकर (माणगांव), तबला साथ- जस्मिन संजय पिळणकर (माणगांव) हार्मोनियम साथ- ओजस्वी संजय पिळणकर (माणगांव), सायं. ६.०० ते ९.०० वा.- भजनाचा कार्यक्रम, रात्रौ ९.३० वा. शेजारती, रात्रौ १०.०० वा. दोन अंकी धम्माल मालवणी विनोदी नाटक "वर्सल" एक रहस्यमय प्रेम कहाणी शुक्रवार दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वा. श्रीदत्त महाराजांची नित्यपूजा दुपारी १.०० वा.- महानैवेद्य, महाआरती व सामुहिक गा-हाणे, दुपारी १.३० वा. - महाप्रसाद (समराधना). या सोहळ्याचे नियोजन श्री दत्तप्रसाद कला क्रीडा मंडळ, लकरकोट, बांदा करत असून सर्वांनी या सोहळ्याचे लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष सुशांत पांगम यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg